थँक्स माय फ्रेंड! रशियाच्या पुतिन यांच्या फोननंतर PM मोदींनी मानले आभार, ट्रम्प काय म्हणाले सगळं काही सांगितलं!

pm modi thanks putin for briefing on alaska meeting with trump : रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करून अलास्कात डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत नेमकं काय बोलणं झालं याची माहिती दिली. युक्रेन संघर्षाच्या दृष्टीनं या दोन्ही नेत्यांमधील चर्चा महत्वाची मानली जाते. तसंच शांततापूर्ण तोडग्यासाठी भारताच्या समर्थनाचा पुनरुच्चारही मोदींनी केला.
pm modi thanks putin for briefing on alaska meeting with trump
pm modi thanks putin for briefing on alaska meeting with trumpsaam tv
Published On
Summary
  • रशियाचे अध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन

  • अलास्कातील ट्रम्प यांच्यातील बैठकीची दिली माहिती

  • मोदींनी पुतिन यांचे आभार मानत भारताची भूमिका केली स्पष्ट

  • युक्रेन संघर्षावर शांततामय तोडग्यासाठी भारताचं समर्थन कायम राहणार

  • ट्रम्प-झेलेन्स्की बैठकीकडं जगाचं लक्ष

Summary

PM Modi - vladimir putin : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सोमवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली. यात पुतिन यांनी मोदी यांना अलास्कामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याची माहिती दिली. शुक्रवारी या दोन नेत्यांमध्ये अलास्कामध्ये बैठक झाली होती. झेलेन्स्की यांच्यासोबत ट्रम्प यांची वॉशिंग्टनमध्ये चर्चा होणार असल्यानं पुतिन यांनी मोदींशी केलेल्या चर्चेला महत्व प्राप्त झालेले आहे.

पुतिन यांच्याशी फोनवरून चर्चा झाल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे दिली. माझे मित्र, पुतिन यांचा फोन कॉल आणि अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत अलीकडेच झालेल्या भेटीतील मुद्द्यांची माहिती दिल्याबद्दल त्यांचे आभार मानतो. भारतानं युक्रेन संघर्षावर शांततापूर्ण तोडगा काढण्याचे नेहमीच आवाहन केले आहे. याबाबतीत सर्व प्रयत्नांचे समर्थन करतो. पुढील काळात आमच्यात सातत्यानं माहितीची देवाण-घेवाण राहील अशी अपेक्षा करतो, असंही मोदी म्हणाले.

मोदींनी स्पष्ट केली भारताची भूमिका

युक्रेन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर झेलेन्स्की आणि ट्रम्प यांच्यात भेट होण्याची शक्यता असून, पुतिन आणि मोदी यांच्यात झालेल्या चर्चेला महत्व प्राप्त झाले आहे. त्याचवेळी पंतप्रधान मोदींनी संघर्षावर शांततापूर्ण तोडगा निघावा आणि त्यासाठीच्या प्रयत्नांसाठी भारताचे समर्थन राहील, या भूमिकेचा पुनरूच्चार केला. तसेच पुतिन आणि मोदी या दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय सहकार्याच्या अनेक मुद्द्यांवर चर्चा देखील केली. पुढील काळातही संपर्कात राहण्यावर या दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली.

pm modi thanks putin for briefing on alaska meeting with trump
Trump Putin Summit : भारतावरचा टॅरिफ रद्द होणार? ट्रम्प-पुतीन भेटीत काय घडलं?

झेलेन्स्की-ट्रम्प भेट

अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये आज रात्री झेलेन्स्की आणि ट्रम्प यांची भेट होणार आहे. दुसरीकडं भारत आणि रशियाची मैत्री आणि व्यापारी संबंधांमुळं अलीकडेच अमेरिकेच्या अध्यक्षांनी भारतावर टॅरिफ लावला आहे. जर हे युद्ध थांबले आणि शांतता प्रस्थापित झाली तर, भारतावर लादलेले टॅरिफही रद्द केले जाऊ शकते. भारत हा रशियाचा मोठा भागीदार देश आहे. त्यामुळं ट्रम्प-झेलेन्स्की बैठकीत जो निर्णय घेतला जाईल, त्याचा रशियासह भारतावरही थेट परिणाम होऊ शकतो, असं मानलं जातं.

pm modi thanks putin for briefing on alaska meeting with trump
Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com