Central Government: ऐन सणाच्यावेळी केंद्र सरकारनं दिली 'गुड न्यूज', पगार अन् पेन्शनबाबत घेतला मोठा निर्णय

Central Government Employees Salary: गणेश चतुर्थी आणि ओणम या सणांच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आगाऊ पगार आणि पेन्शन देण्यास मान्यता दिली आहे.
Central Government Employees Salary
Central government announces advance salary and pension for employees and pensioners ahead of Ganesh Chaturthi and Onam festivals.saamtv
Published On
Summary
  • केंद्र सरकारचा कर्मचाऱ्यांना व पेन्शनधारकांना मोठा दिलासा.

  • गणेश चतुर्थी व ओणमपूर्वी आगाऊ पगार आणि पेन्शन दिली जाणार.

  • महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना २६ ऑगस्ट रोजी पगार मिळणार.

  • केरळमध्ये २५ ऑगस्ट रोजी पगार व सणापूर्वीच पेन्शन मिळणार.

सणासुदीचा हंगाम लक्षात घेऊन केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. गणेश चतुर्थी आणि ओणम सणाच्या निमित्त सरकार कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना महिन्याच्याआधीच पगार आणि पेन्शन देण्यास मान्यता दिलीय. अर्थमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात डिफेन्स, पोस्ट आणि टेलीकॉमसह केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना गणेश चतुर्थीच्या आधीच ऑगस्ट महिन्याचा पगार २६ ऑगस्ट २०२५ रोजी मिळणार आहे.

Central Government Employees Salary
ITR Filing : आयकर रिटर्न भरताना तुम्ही कोणती खबरदारी घ्यावी? जाणून घ्या अन् दंड टाळा

महाराष्ट्राप्रमाणेच केरळ राज्यात ४-५ सप्टेंबरपर्यंत ओणम सणाच्या आधीच तेथील कर्मचाऱ्यांना पगार आणि पेन्शनधारकरांना पेन्शन दिलं जाणार आहे. म्हणजेच काय तेथील कर्मचाऱ्यांना २५ ऑगस्ट रोजीच पगार मिळणार आहे. सणासुदीच्या काळात कर्मचाऱ्यांना कोणत्याही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये. ते त्यांच्या कुटुंबियांसोबत हा सण चांगल्या प्रकारे साजरा करू शकतील, त्यासाठी सरकारने हा निर्णय घेतलाय. अर्थ मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात ही देयके आगाऊ देयके म्हणून गणली जातील.

Central Government Employees Salary
Agriculture Livestock Scheme: आबा ऐकलं का! सरकार देणार गाई-म्हशी घेण्यासाठी अनुदान, जाणून घ्या योजनेची संपूर्ण माहिती

जारी केलेले पगार, पेन्शन आणि वेतन ऑगस्ट/सप्टेंबर २०२५ च्या अंतिम सेटलमेंटमध्ये समायोजित केले जाणार आहेत. "अशा प्रकारे वितरित केलेला पगार/मजुरी/पेन्शन आगाऊ रक्कम म्हणून गणला जाईल आणि प्रत्येक कर्मचारी/पेन्शनधारकाच्या संपूर्ण महिन्यासाठी पगार/मजुरी/पेन्शन निश्चित केल्यानंतर समायोजनाच्या आधीन असेन.", असे अर्थमंत्रालयानं म्हटलंय. दरम्यान मंत्रालयाने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ला केरळ आणि महाराष्ट्रातील बँकांच्या शाखांना पगार आणि पेन्शनची आगाऊ रक्कम देण्याची योजना कोणत्याही विलंबाशिवाय लागू करण्याचे निर्देश देण्याची विनंती केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com