
आयकर रिटर्न दाखल करण्याची अंतिम तारीख जवळ येत असल्याने करदात्यांनी विशेष सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरल्यास काम पूर्ण व्हायला विलंबच नाही तर दंडही भरावा लागू शकतो. त्यामुळे आयकर विभागाने करदात्यांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.
सध्या आयकर पोर्टलवर डीफॉल्टनुसार नवीन कर प्रणाली निवडली जाते. मात्र, करदात्यांना हवे असल्यास जुन्या कर प्रणालीचा पर्याय देखील वापरता येतो. कर व्यवस्थेची निवड आपल्या गरजेनुसार आणि सोयीप्रमाणे करणे आवश्यक आहे. यासोबतच सर्व कागदपत्रांची पडताळणी करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. करदात्यांनी फॉर्म 26एएस, एआयएस डाउनलोड करून त्यातील माहिती जुळते का याची खात्री करून घ्यावी.
आयटीआर दाखल करताना बँक स्टेटमेंट, व्याज प्रमाणपत्र, गुंतवणूक पुरावे, फॉर्म 16, कपातीच्या पावत्या अशी आवश्यक कागदपत्रे एकत्र ठेवणे आणि त्यांचे बारकाईने पुनरावलोकन करणे महत्त्वाचे आहे. चुकीचे कागदपत्र किंवा अपूर्ण माहितीमुळे रिटर्न प्रक्रिया अडचणीत येऊ शकते. योग्य आयटीआर फॉर्मची निवड ही देखील खबरदारीचा महत्त्वाचा भाग आहे. आयटीआर-१ ते आयटीआर-७ या प्रकारांपैकी करदात्यांनी आपल्या उत्पन्न आणि परिस्थितीनुसार योग्य फॉर्म निवडला पाहिजे. त्यामध्ये एकूण उत्पन्न, वजावट, व्याज, भरलेला किंवा गोळा केलेला कर याची अचूक माहिती नोंदवणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे आयटीआर-१ सोबत कोणतीही कागदपत्रे जोडण्याची आवश्यकता नसते.
तसेच, पॅन, पत्ता, संपर्क माहिती, बँक खात्याचे तपशील अशी वैयक्तिक माहिती योग्यरीत्या भरली आहे का याचीही खात्री करणे महत्त्वाचे आहे. छोट्या चुका टाळल्यास भविष्यातील मोठ्या अडचणी टाळता येऊ शकतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अंतिम मुदत चुकवू नका. ठरलेल्या तारखेला किंवा त्यापूर्वी रिटर्न दाखल करणे आवश्यक आहे. उशिरा दाखल केल्यास अतिरिक्त शुल्क, कॅरी-फॉरवर्ड फायद्यांचा तोटा, तसेच सूट आणि वजावट उपलब्ध होणार नाहीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.