Uttar Pradesh Accident ANI
देश विदेश

Uttar Pradesh Accident: भरधाव कार आधी डिवाइडरला धडकली नंतर ट्रकवर आदळली; भीषण अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू

Uttar Pradesh Hapur Accident:उत्तर प्रदेशमधील हापूरमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. एका कारने आधी डिवाइडर ओलांडला त्यांनतर पलीकडे उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली आहे. यात सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उत्तर प्रदेशमधील हापूरमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. एका कारने आधी डिवाइडर ओलांडला त्यांनतर पलीकडे उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली आहे. यात सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहे. सोमवारी रात्री ही घटना घडली आहे. हा अपघात खूपच भीषण होता.

पोलिसांना या अपघाताची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही कार नियंत्रणात नव्हती त्यामुळे हा अपघात झाला आहे. बऱ्याच प्रयत्नानंतर कारमधून मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास ही कार हापूरहून मुरादाबादच्या दिशेने जात होती. दिल्ली लखनऊ महामार्गावरील डिवाइडरचा ही कार धकडली. त्यानंतर पलीकडे जाऊन ट्रकला धडकली. या अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. पोलिसांनी कारमधील लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना तेथील लोकांच्या मदतीने दोन जखमींना बाहेर काढले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, कार अपघातात अनुपम, अंकित, जीतू, शंकर, संदीप यांचा मृत्यू झाला आहे. मृत व्यक्तींचे वय जवळपास ३० वर्षांच्या आसपास आहे. पोलिसांनी हे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पोलिस पुढील तपास करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रत्नागिरी - आंबा घाटात दरड कोसळली

Urfi Javed: डोळ्याखाली जखम, चेहऱ्यावर रक्त; उर्फी जावेदची अशी का झाली अवस्था ? चाहते चिंतेत

७५ वर्षीय वृद्धेचे अब्रुचे लचके तोडले, झोपडपट्टीत घुसून तरूणाकडून जबरदस्ती, परिसरात खळबळ

Driving School: ड्रायव्हिंग शिकण्यासाठी सर्वोत्तम शाळा कशी निवडावी? अर्ज करण्याचे स्टेप-बाय-स्टेप टिप्स

Mumbai Rain : मानखुर्दमध्ये पावसाचे तांडव, रस्त्यांवर नदी, कमरेइतके पाणी, नागरिकांची कसरत

SCROLL FOR NEXT