Narendra Modi News: मतदानाला सुरुवात होताच PM मोदींची मराठीतून पोस्ट; मतदारांना केलं खास आवाहन

Maharashtra Lok Sabha Election 2024 : लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीत पोस्ट केली आहे.
मतदानाला सुरुवात होताच PM मोदींची मराठीतून पोस्ट
Maharashtra Lok Sabha Election 2024Saam TV

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी देशातील १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ९६ लोकसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ११ मतदारसंघाचा समावेश आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदान करण्यासाठी नागरिकांना मतदान केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लावल्या आहेत. दरम्यान, मतदानाला सुरुवात होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीत पोस्ट केली आहे.

मतदानाला सुरुवात होताच PM मोदींची मराठीतून पोस्ट
Ahmednagar Lok Sabha: अहमदनगरमध्ये सुजय विखे अन् निलेश लंकेंचे कार्यकर्ते भिडले; रस्त्यावर पडलेली ती पैशांची बॅग कुणाची? VIDEO व्हायरल

नेमकं काय म्हणाले PM मोदी?

मतदानाला सुरुवात झाल्यानंतर काही वेळामध्येच पंतप्रधान मोदींनी आपल्या अधिकृत X (पूर्वीचे ट्वीटर) अकाउंटवरून मराठीत एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मतदारांना विक्रमी संख्येनं मतदान करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे.

"लोकसभा निवडणुकीच्या आजच्या चौथ्या टप्प्यात, 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 96 जागांसाठी मतदान होत आहे. या मतदारसंघातील लोक मोठ्या संख्येने मतदान करतील आणि युवा मतदार तसेच महिला मतदार यात प्रामुख्याने अग्रेसर असतील अशी मला खात्री आहे", असं पंतप्रधान मोदींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.

चला, आपण सगळे आपले कर्तव्य बजावूया आणि आपली लोकशाही अधिक बळकट करूया, असं आवाहन देखील मोदींनी मतदारांना केलं आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी मराठी बरोबरच हिंदी, इंग्रजीमध्येही आपल्या एक्स अकाऊंटवरुन पोस्ट केली आहे. त्यांनी बंगाली आणि तमिळसहित इतर मतदारांना देखील मतदानाचे आवाहन केले आहे.

महाराष्ट्रात कोणकोणत्या मतदारसंघात मतदान?

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघात आज सोमवारी मतदान होत आहे. यामध्ये नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजी नगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड या लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. निवडणुकीत दिग्गजांचं भवितव्य पणाला लागलं आहे.

मतदानाला सुरुवात होताच PM मोदींची मराठीतून पोस्ट
Weather Forecast: मतदानाच्या दिवशीच राज्यात तुफान पावसाचा इशारा; जालन्यासह 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com