Woman Dies After Intoxicated Doctor Performs Surgery Saam
देश विदेश

Youtube बघून ऑपरेशन, डॉक्टरचं दारूच्या नशेत भयंकर कृत्य, महिलेच्या नसा, आतडी अन् अन्ननलिका कापली

Woman Dies After Intoxicated Doctor Performs Surgery: Youtube बघून ऑपरेशन केलं, डॉक्टरनं दारू पिऊन महिलेची आतडे, नसा अन् अन्ननलिका कापली. महिलेचा जागीच मृत्यू. डॉक्टर आरोपी फरार.

Bhagyashree Kamble

उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका ढोंगी डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे एका महिलेचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या डॉक्टरनं महिलेची शस्त्रीक्रिया युट्यूब पाहून केले आहे. तसेच डॉक्टर नशेत असल्याची माहिती आहे. त्यानं नशेत महिलेची आतडे, नसा तसेच अन्ननलिका कापली. या घटनेनंतर पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घातलं. तसेच आरोपीचा शोध घेण्यास पथके तयार केली. सध्या फरार आरोपीचा शोध सुरू आहे.

ही घटना कोठी पोलीस स्टेशन परिसरातील डफरापूर मजरा सैदनपूर येथील आहे. फतेह बहादूर यांनी सांगितले की, ५ डिसेंबर रोजी दुपारी पत्नी मुनिष्रा रावत हिच्या पोटात तीव्र वेदना झाल्या. फतेह यांनी त्यांच्या पत्नीला श्री दामोदर रूग्णालयात नेले. हा दवाखाना ज्ञान मिश्रा आणि विवेक मिश्रा चालवत असल्याची माहिती आहे. तपासणीदरम्यान, ज्ञान प्रकाश यांनी मुनिष्राला किडनी स्टोन असल्याचं सांगितलं.

उपचारासाठी २५ हजार रूपये लागतील, असं त्याने सांगितलं. मात्र, दोघांमध्ये २० हजार रूपयांत करार झाला. पैसे मिळाल्यानंतर ज्ञान प्रकाशने युट्यूब पाहून महिलेची शस्त्रक्रिया केली, असा आरोप आहे. मुनिष्राच्या पोटात चिरे पाडून लहान आतडे, नसा कापून टाकल्या. ऑपरेशननंतर महिलेला प्रचंड वेदना राहिल्या. दुसऱ्या दिवशी रूग्णालयातच महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला.

महिलेचा मृत्यू होताच ज्ञान प्रकाशने आपल्याला कुटुंबासोबत पळ काढला. ९ डिसेंबर रोजी फतेह यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन ज्ञान प्रकाश आणि विवेक मिश्राविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी विविध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. दरम्यान, फतेह यांनी रूग्णालय बनावट असून, आरोपींकडे कोणतीही वैद्यकीय पदवी नसल्याचा दावा केला आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी बेकायदेशीर रूग्णालयाला भेट देऊन नोटीस बजावली. तसेच या नोटीशीला एका आठवड्यात उत्तर देण्यास सांगितले. दरम्यान, आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली असून, पुढील तपास सुरूये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बलात्कार अन् प्रायव्हेट पार्टमध्ये कापडाचे तुकडे... क्रूर बॉयफ्रेंडनं विवाहित महिलेला छळलं, शेवटी तिनं आयुष्य संपवलं

Gold Rate Today: खुशखबर! आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याचे दर घसरले, चांदीला उतरती कळा; २२ अन् २४ कॅरेटचे भाव किती? वाचा

5 Trendy Blouse Design: सिंपल अन् फॅन्सी साडीवर उठून दिसतील हे 5 ब्लाऊज डिझाईन्स, महिलांनो नक्की ट्राय करा

Flamingo Season: गुलाबी थंडीत फ्लेमिंगो पाहायला जा; हे आहे नवी मुंबईजवळ सुंदर लोकेशन

Akshaye Khanna Dhurandhar : १,२,३ नव्हे अभिनेत्रीने अक्षय खन्नाच्या ७ वेळा थोबाडीत मारली, नेमकं झालं काय?

SCROLL FOR NEXT