Hotel मालक अन् वेटरकडून २ तरूणांना मारहाण; कारण फक्त एवढंच..., पुण्यात नेमकं घडलं काय?

Pune Hotel Owner and Waiter Beat Customers Over Argument: पुण्यात हॉटेलच्या वेटर आणि मालकाकडून २ तरुणांना मारहाण. किरकोळ कारणावरून वाद झाला असल्याची माहिती. ४ जणांविरोधात गुन्हा दाखल.
Pune Crime News
Pune Crime NewsSaam
Published On

अक्षय बडवे, साम टिव्ही

पुण्यात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे. अशातच हॉटेलमधील मारहाणीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हॉटेलच्या वेटर आणि मालकाकडून २ तरूणांना मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या मारहाणप्रकरणी पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना पुण्याजवळील मांजरी येथील हॉटेल हॅप्पी पंजाब येथे घडली. आशिष भगत आणि त्याच्या मित्राला बेदम मारहाण करण्यात आली. घटनेच्या दिवशी आशिष भगत आणि त्याचा मित्र पुण्यातील बेलेकर वस्ती या परिसरात असलेल्या हॉटेलमध्ये जेवायला गेले होते.

Pune Crime News
पालकांच्यामध्ये २३ दिवसांचं बाळ झोपलं; कूस बदलली अन् बाळाचा गुदमरून मृत्यू, आईनं फोडला टाहो

जेवण झाल्यानंतर गेट उघडायला सांगितल्यानंतर वेटरने वाद घालण्यास सुरूवात केली. वाद विकोपाला गेला. वादाचं रूपांतर जोरदार हाणामारीत झालं. वेटर आणि हॉटेल मालकाने मिळून दोघांना बेदम मारहाण केली. या हाणामारीत भगत आणि त्याचा मित्र गंभीर जखमी झाले असून, हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

या मारहाण प्रकरणानंतर दोघांनीही हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच तक्रार दाखल केली. या मारहाण प्रकरणी पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला. आता पोलीस आरोपींवर काय कारवाई करणार? हे पाहणं महत्वाचं ठरेल. दरम्यान, या घटनेनंतर पुण्यात खळबळ उडाली असून, गु्न्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्यामुळे नागरिकांनी चिंता व्यक्त केली.

Pune Crime News
उठता - बसता हाडांचा कटकट आवाज येतो? तिशीतच गुडघेदुखीनं त्रस्त; किचनमधील खा 'हा' पदार्थ, व्हाल फिट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com