

बिहारच्या सीतामढी जिल्ह्यात एचआयव्ही रूग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. काही माध्यमांच्या वृत्तानुसार, या जिल्ह्यात एचआयव्ही पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या तब्बल ७,४०० वर पोहोचली असून, दरमहा ४० ते ६० नवे रूग्ण आढळत आहेत. यामुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. दरम्यानस एड्स रूग्णांच्या एकूण संख्येबाबत अद्याप स्पष्टता नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या रूग्णांमध्ये ४०० हून अधिक अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. सीतमढीमध्ये एचआयव्हीचा प्रसार इतक्या झपाट्याने का वाढतोय? याबाबतही गावात चर्चा आहे. एका वृत्तनाहिनीशी बोलताना वैद्यकीय अधिकारी डॉ. हसीन अख्तर यांनी सांगितले की, 'या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दिल्ली, मुंबई आणि इतर शहरांमध्ये काम करणारे स्थलांतरित लोक राहतात. या कारणामुळे संक्रमणाचा धोका अधिक वाढतो'.
सध्या सीतामढी येथील एआरटी सेंटरमार्फत महिन्याला ५,००० रूग्णांना नियमित उपचार दिले जात आहेत. डॉ. अख्तर म्हणाले, 'जेवढे पॉझिटिव्ह रूग्ण आहेत. त्यांनी निगेटिव्ह व्यक्तींशी विवाह करू नये. हा संसर्ग रोखण्यासाठी जागरूकता अतिशय महत्त्वाची आहे'. सध्या विविध भागांत जागरूकता कार्यक्रम वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ग्रामीण भागात मोठ्या प्रमणावर एचआयव्ही चाचण्या घेण्याच्याही चर्चा सुरू आहे.
दरम्यान, समाजमाध्यमांमध्ये सीतामढीतील एड्स रूग्णसंख्येबाबत अनेक दावे केले जात आहेत. काही रिपर्ट्सनुसार, डिसेंबर २०२५पर्यंत बिहारमध्ये १७,००० लोतकांना एड्सचे निदान झाले आहे. तर, सीतामढी जिल्ह्यात ही संख्या ६,७०७ आहे. ज्यात ४२८ मुले आहेत. ही आकडेवारी २०१२ ते २०२५ या १३ वर्षांच्या कालावधीतील एकूण संख्या आहे. ती केवळ चालू वर्षाची किंवा या महिन्याची आकडेवारी नसल्याचं आरोग्य विभागाने स्पष्ट केलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.