up Crime News Saamtv
देश विदेश

UP Crime News: लग्नघरात घडलं भयंकर! नवरा- नवरीसह ५ जणांची निर्घृण हत्या; ह्रदयद्रावक घटनेने परिसरात खळबळ

Mainpuri Crime: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Gangappa Pujari

Uttar Pradesh Crime News: उत्तरप्रदेशमधून एक ह्रदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. उत्तरप्रदेशच्या मैनपूरमध्ये एका तरुणाने आपल्या आपल्या नवविवाहीत भावासह त्याच्या पत्नीची आणि भावोजी, मित्र आणि धाकटा भाऊ अशा एकूण 5 नातेवाईकांची हत्या केली आहे.

या हत्येनंतर त्याने स्वतःच्याही डोक्यात गोळी झाडून घेतली, ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. या भयंकर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Crime News IN Marathi)

काय आहे संपूर्ण प्रकरण?

याबाबत अधिक माहिती अशी की, शिववीर यादव नावाच्या तरुणाने पाच जणांची हत्या करुन स्वतःही आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. किशनी पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या गोकुलपूर आरसारा गावामध्ये ही भयंकर घटना घडली. शिववीरच्या धाकट्या भावाचं लग्न शुक्रवारी झाले होते.

28 वर्षीय शिववीरने त्याचा भाऊ भुल्लन यादव (25), कालच लग्न झालेला भाऊ सोनू यादव (21), सोनूची पत्नी सोनी (20 वर्ष), भावोजी सौरभ (22 वर्ष) आणि मित्र दीपकवर कुऱ्हाडीने हल्ला केला. यावेळी हे सर्वजण झोपेत असताना शिववीरने कुऱ्हाडीने हल्ला करुन या सर्वांची हत्या केली. त्याने पत्नी डॉली (24) आणि मामी सुषमा यांच्यावरही हल्ला करुन त्यांना जखमी केले. त्यानंतर शिववीरने गावठी पिस्तुलने स्वत:वर गोळी झाडली. (Crime News)

दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत व्यक्तींच्या मृतदेहांचे शवविच्छेदन केल्यानंतर ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. तसेच या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Death: दादा तुमचा निर्णय चुकला...; अजित पवारांच्या आठवणीच उपमुख्यमंत्री शिंदे भावुक

कल्याण डोंबिवलीत कोळी समाजाचा रोष; बांगलादेशी मच्छी विक्रेत्यांवर तात्काळ कारवाईची मागणी

Maharashtra Live News Update: लातूरच्या पोहरेगाव परिसरात गारांचा पाऊस, शेती पिकांचे मोठं नुकसान

Avoid coconut paste in vegetables: कोणत्या भाज्यांमध्ये खोबऱ्याचं वाटण वापरू नये?

Shocking: बीचवर रोमान्स करताना भयंकर घडलं, लाटेसोबत कपल गेलं वाहून, थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT