Maharashtra Weather Update: राज्यात आज अनेक ठिकाणी मान्सूनने हजेरी लावली आहे. पुढचे ५ दिवस राज्यात मान्सून बहुतांश भागात सक्रिय असण्याची शक्यता आहे. कोकणात व विदर्भात काही दिवस मुसळधार ते अती मुसळधार पाऊस बरसू शकतो, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. (Latest Marathi News)
कोकण आणि विदर्भासह पुणे, सातारा आणि नाशकातही मुसळधार ते अती मुसळधार पाऊस बरत आहे. मराठवाड्यामध्ये देखील कालपासून पावसाचा जोर कायम आहे. कोकण, विदर्भ, मराठवाडा, पुणे, सातारा, नाशिक या सर्वच शहरांमध्ये पुढचे ५ दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे.
हवामान खात्याने (Weather Department) दिलेल्या माहितीनुसार, रायगडमध्ये आज मुसळधार पाऊस बरत आहे. तसेच रात्रीपर्यंत यलो अलर्ट जारी केलाय. पालघर, ठाणे आणि मुंबईसाठी २६ ते २८ जून या दिवसांत देखील अती मुसळधार पावसाची शक्यता आहे. तीन दिवस या शहरांना यलो अलर्ट देण्यात आलाय.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये २५ ते २८ जून या कालावधीत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पावसाच्या आगमनामुळे बळीराजा काही प्रामाणात सुखावला आहे. गावात सर्वत्र पेरणीला सुरुवात झाली आहे.
रिमझिम पावसाने मुंबईकर सुखावले
मुंबईत (Mumbai) काल रात्रीपासून पुढील ३ ते ४ तासात मुंबई, रायगड, ठाणे, पालघर भागात रिमझिम पाऊसाचा अंदाज आहे. सकाळपासून मुंबईत रिमझिम पावसाला सुरुवात झालीये. दादर, कुर्ला, बांद्रा, बोरिवली, कुलाबा परिसरात सकाळपासून पावसाने हजेरी लावली आहे. पावसाचा परिणाम लोकल ट्रेनवर काही प्रमाणात झाला आहे. मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल ट्रेन ५ ते ७ मिनिटे उशिराने धावत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.