Mumbai Rain Update: उकाडा सोडा, छत्र्या-रेनकोट बाहेर काढा; मुंबईसह राज्यातील काही भागात पावसाच्या सरी

Mumbai Rain Update: गेल्या पाच दिवसांत मुंबईत सकाळी तुरळक पाऊस पडताना पाहायला मिळतोय.
Mumbai Rain Update
Mumbai Rain UpdateSaam tv
Published On

निवृत्ती बाबर

Monsoon Update: गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईकर नागरिक मान्सूनच्या प्रतीक्षेत होते. गेल्या पाच दिवसांत मुंबईत सकाळी तुरळक पाऊस पडताना पाहायला मिळतोय. आज देखील मुंबई उपनगर, मुंबई शहरात पाऊस पडत आहे. मुंबईत पुढील ७२ तासांत सलग मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. तर तुरळक पावसामुळे उकाड्याने हैराण झालेले नागरिक सुखावले आहेत. (Latest Marathi News)

हवामान विभागाने महाराष्ट्राच्या अनेक भागात यलो अलर्ट जारी केला आहे. मान्सून हा २९ तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे. तर हवामान विभागाने सोमवार आणि मंगळवारी (26-27 जून) मुंबई आणि नजीकच्या ठाणे आणि पालघरमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. तर मुंबईतील काही भागात पावसाला सुरुवात झाली आहे.

Mumbai Rain Update
Maharashtra Petrol Diesel Price: महाराष्ट्रात आज एक लिटर पेट्रोलसाठी मोजा इतके रुपये; नवीनतम दर तपासा

मुंबईच्या दादर, वांद्र, अंधेरी,कुर्ला, वरळी, मुंबई सेंट्रल परिसरात पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. पुढील ७२ तासात सलग मान्सून मुंबईत दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

ठाण्यात कोसळल्या पावसाच्या सरी

दरम्यान, मुंबईप्रमाणे ठाण्यातील कळवा आणि मुंब्रा येथे आज सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली आहे. कळवा मुंब्रा येथे सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे परिसरातील वातावरण थंड झाले आहे. काल शुक्रवारी सकाळी पाऊसाच्या काही सरी बरसल्यानंतर दिवसभर पावसाने उसंती घेतली होती. त्यानंतर आज शनिवारी सकाळीच पावसाने हजेरी लावली आहे.

बुलढाण्यात धुक्याची चादर

बुलढाणा जिल्ह्यात काही महिन्यापासून सूर्य आग ओकत होता. उन्हाचा पारा वाढतच गेल्याने नागरिक हैराण झाले होते. मात्र आज सकाळी अचानक बुलढाणा शहरातील काही भागात धुक्याची चादर पसरल्याचे दिसून आली. त्यामुळे नागरिकांमध्ये उत्साह दिसून आला आहे.

Mumbai Rain Update
Covid Center Scam: कोव्हिड सेंटर घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जे. जे रुग्णालयातील डॉक्टरांचं नाव आलं समोर

पावसाळा सुरू होऊन एक महिना उलटला असून अद्याप जिल्ह्यात कुठेही पाऊस झाला नाही. शेतकऱ्यांसह नागरिक आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत. आज सकाळी मात्र बुलढाणा शहरानजीक असलेल्या राजूर घाटात धुक्याची चादर दिसून आली असून ढगाळ वातावरण झाले आहे. यामुळे हवेत थोडाफार गारवा निर्माण झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com