Uttar Pradesh Crime Saam Tv
देश विदेश

Crime: १००० रुपयांत बायकोला विकलं, जंगलात नेलं; नवऱ्याच्या मित्रांनी केला सामूहिक बलात्कार

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशमध्ये भयंकर घटना घडली. एका तरुणाने बायकोला १००० रुपयांमध्ये मित्रांना विकलं. आरोपींनी महिलेला शेतात घेऊन जा तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. या प्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Priya More

Summary:

  • उत्तर प्रदेशमध्ये तरुणाने बायकोला १००० रुपयांमध्ये विकले

  • तरुणाने मित्रांच्या ताब्यात बायकोला दिले

  • आरोपींनी महिलेला जंगलात नेले आणि तिच्यावर बलात्कार केला

  • या प्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

उत्तर प्रदेशमध्ये एका तरुणाने आपल्या बायकोला १००० रुपयांमध्ये मित्रांना विकलं. नवरा -बायकोच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी ही घटना उत्तर प्रदेच्या बदायू जिल्ह्यातील एका गावात घडली. नवऱ्याने बायकोला विकल्यानंतर आरोपी नराधमांनी तिला जंगलात नेले आणि त्याठिकाणी तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला.

घडलं असं की, आरोपीने आपल्या बायकोला मित्रांच्या दुचाकीवर बसवले होते. नवऱ्यावर विश्वास ठेवून ही महिला दुचाकीवर बसली. आरोपींनी दुचाकी महिलेच्या घराकडे नेण्याऐवजी सालवा जंगलाच्या दिशेने नेली. आरोपींनी महिलेला जंगलात देऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. बेशुद्धावस्थेत आरोपी महिलेला तिथेच सोडून निघून गेले. शुद्धीवर आल्यानंतर महिला घरी आली.

महिलेने घरी आल्यानंतर तिच्या नवऱ्याला घडलेल्या घटनेविषयी सांगितले तेव्हा तिला कळाले की तिच्या नवऱ्यानेच हे षडयंत्र रचले होते. नवऱ्यानेच आरोपींकडून १००० रुपये घेत तिला त्यांच्यासोबत पाठवले होते. या घटनेनंतर महिलेला मोठा धक्का बसला. तिने तिच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपी नवरा बदन सिंग आणि त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर आरोपी नवरा आणि त्याचे मित्र घटनास्थळावरून पळून गेले. पोलिस सध्या आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. आरोपीला कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली. या घटनेमुळे उत्तर प्रदेशमध्ये खळबळ उडाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कडक "फुलचंद" खाताय? पानांमधून अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टपऱ्यांवर पुणे पोलिसांचा वॉच

Eknath Shinde : अन् एकनाथ शिंदे ठाकरेंना सर्वांसमोरच म्हणाले साहेब, पाहा व्हिडिओ

Kharat case : विकृत खरातचा आणखी एक कारनामा समोर, बडे उद्योगपती अडकले हनी ट्रॅपमध्ये?

Mumbai Fire : मुंबईत पॉश एरियात आगीचा भडका, २२ मजली इमारतीत भीषण आग

Ashok Kharat Case: भोंदू बाबा अशोक खरातसोबत फोटो असणाऱ्या नेत्यांवर कारवाई होणार का? काय म्हणाले मुख्यमंत्री?

SCROLL FOR NEXT