Uttar Pradesh Crime News Saam Tv
देश विदेश

Crime: भाजप नेत्याकडून बायकोची हत्या, अनैतिक संबंधाचा संशय; किचनमध्येच चाकूने सपासप वार

BJP leader kills wife in Uttar Pradesh: भाजप नेत्याने बायकोची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. उत्तरप्रदेशच्या आंबेडकरनगरमध्ये ही घटना घडली. आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या

Priya More

Summary -

  • भाजप नेत्याकडून बायकोची निर्घृण हत्या

  • किचनमध्ये चाकूने सपासप वार

  • पत्नी खासगी शाळेत शिक्षिका होती

  • अनैतिक संबंधाच्या संशयावरून हत्या

  • आरोपी पतीसह आई-वडिलांना अटक

उत्तर प्रदेशमध्ये भाजप नेत्याने बायकोची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. आंबेडकरनगरमध्ये राहणाऱ्या भाजप नेत्याने चाकूने बायकोचा गळा चिरून हत्या केली. घरातील किचनमध्ये रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह आढळून आला. भाजप नेत्याची बायको शाळेत शिक्षिका होती. या घटनेमुळे उत्तर प्रदेशमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. महिलेचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी आरोपी भाजप नेता उमाशंकर सिंहला अटक केली. त्याची चौकशी केली जात आहे. अनैतिक संबंधाच्या संशयावरून त्याने हे भयंकर कृत्य केले. या प्रकरणी भाजप नेत्यासह त्याच्या आई-वडिलांना देखील पोलिसांनी अटक केली.

भाजप नेता बायकोच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. तिचे अनैतिक संबंध असल्याचे त्याला वाटायचे. तसंच तो दोन्ही मुलं आपली नसल्याचे म्हणायचा. आरोपी उमाशंकर हा भाजपचा शहर मीडिया प्रभारी आहे. तो जेसीबी मशीन देखील चालवतो. त्याची बायको सोनी खासगी शाळेत शिक्षिका होती. उमाशंकर आणि सोनी यांना दोन मुलं आहेत.

सोमवारी सकाळी १० वाजता सोनी यांनी मुलांना शाळेत पाठवलं. त्यानंतर त्यांची सासू मार्केटमध्ये गेली. तर सासरा काही कामासाठी कोर्टात गेला. सोनी घरामध्ये एकट्याच होत्या. त्यावेळी आरोपीने उमाशंकरने त्यांच्या गळ्यावर चाकू फिरवला. जास्त रक्तस्राव झाल्यामुळे सोनी यांचा जागीच मृत्यू झाला. सोनी यांची सासू घरी आल्यानंतर हे प्रकरण समोर आले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पोलिसांनी भाजप नेता, त्याचे आई-वडिला यांना अटक केली. पोलिस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'भाजपचा वॉच, नगरसेवकांचे फोन टॅप'; संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

Maval Politics: फॉर्म भरण्याच्या दिवशीच मावळात हाय व्होल्टेज ड्रामा; राष्ट्रवादी-भाजप कार्यकर्ते आमने-सामने

महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; भाजप शिंदेसेनेविरोधात पोलिसात जाणार, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Fact check: कर्ज देणारा करोडपती भिकारी...; व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Maharashtra Politics: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणार का? अजित पवारांच्या गटातील बड्या नेत्याचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT