Uttar Pradesh Ghaziabad Six Year Old Girl Killed By Parents Saam Tv
देश विदेश

Crime News : धक्कादायक! क्रूर आई-बापानंच केली पोटच्या ६ वर्षांच्या मुलीची हत्या, कारण वाचून डोक्यात तिडीक जाईल

Uttar Pradesh Ghaziabad Crime News : उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये कपडे घाण केल्याच्या कारणावरून सावत्र आई आणि वडिलांनी ६ वर्षांच्या चिमुकलीला बेदम मारल्याने तिचा मृत्यू झाला. आरोपींना ताब्यात घेऊन पोलीस तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • कपडे घाण केल्याच्या कारणावरून ६ वर्षांच्या मुलीची हत्या

  • सावत्र आई आणि वडिलांवर गंभीर आरोप

  • मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला; आरोपी ताब्यात

  • घटनेनंतर परिसरात खळबळ, पोलिसांचा तपास सुरू

Uttar Pradesh Ghaziabad Six Year Old Girl Killed By Parents उत्तर प्रदेशातील गाझियाबाद मधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. कपडे घाण केले म्हणून जन्मदात्या आई वडिलांनी ६ वर्षांच्या मुलीची हत्या केली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. धक्कादायक म्हणजे या चिमुकलीची आई सावत्र आई असल्याचं समोर आलं आहे. चिमुकलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सिया (बदलेलं नाव) ही ६ वर्षीय चिमुकली आपल्या सावत्र आई मधुरा (बदलेलं नाव) आणि वडील (मनोज) सोबत राहत होती. मनोजने पहिले लग्न मुरादनगरमधील नेकपूर गावातील रहिवासी झहीर अहमद यांची मुलगी गुलजारशी केले होते. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा होता. दरम्यान गुलजारच्या मृत्यूनंतर मनोजने दुसरं लग्न केलं.

मनोजची दुसरी बायको मधुरा ही मनोजच्या मुलांचा सतत छळ करायची. दरम्यान सोमवारी ६ वर्षांच्या सियाने कपडे खराब केले म्हणून मधुराने आणि मनोजने तिला बेदम मारले. या मारहाणीत सिया बेशुद्ध झाली. तिला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र तिथे तिला मृत घोषित करण्यात आले. हा सगळा प्रकार गुलजारच्या माहेरच्यांना कळताच त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. तिथे तिच्या अंगावर मारलेले व्रण दिसून आले. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत असून नराधम आई बापांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आम्ही राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांच्या पाठिशी; क्राइम ब्रांचच्या कारवाईनंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

Vijay Hazare Trophy: सेमीफायनमध्ये या ४ टीम्सने मारली दणक्यात एन्ट्री; पाहा कुठे आणि कधी रंगणार सामने

Maharashtra Live News Update : नरेश अरोरा यांच्या कारवाईवर सुनिल तटकरे यांची पहिली प्रतिक्रिया

Makar Sankranti 2026: मकरसंक्रांतीला करा विशेष उपाय; संकटं, अडथळे, पैशांची तंगी, अडचणी होतील दूर

Homemade Facepack: नॅचरल ग्लोसाठी आठवड्यातून २ वेळा हा खास होममेड फेसपॅक नक्की लावा

SCROLL FOR NEXT