Bulandshahr Car Accident Kills 5 People  Saam Tv News
देश विदेश

डुलकी आली अन् आक्रित घडलं, भरधाव कार डिव्हायडरला धडकून खड्ड्यात पडली; कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू

Bulandshahr Car Accident Kills 5 People : बुलंदशहरमध्ये एका अनियंत्रित कारने डिव्हायडरला धडक दिल्यानंतर आग लावली. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू झाला.

Prashant Patil

बुलंदशहर : बुलंदशहरमध्ये एका अनियंत्रित कारने डिव्हायडरला धडक दिल्यानंतर आग लावली. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू झाला, ज्यामध्ये १ महिला गंभीर जखमी झाली आहे आणि तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बदायूंमधील सहस्वान येथून लग्न समारंभाला उपस्थित राहून हे कुटुंब दिल्लीला परतत होतं. पहाटेच्या सुमारास हा दुर्दैवी अपघात घडला.

अपघाताचं कारण आलं समोर

चालकाला झोप लागल्याने हा अपघात झाला. कार एका डिव्हायडरला धडकली आणि खड्ड्यात पडली. कार खड्ड्यात पडताच तिला आग लागली. या कारमध्ये प्रवास करणाऱ्या एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू झाला. जहांगीराबाद पोलीस स्टेशन परिसरातील बुलंदशहर अनुपशहर रस्त्यावरील जानी गावाजवळ हा दुर्दैवी अपघात घडला.

जणांचा मृत्यू, १ गंभीर जखमी

या अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १ महिला गंभीर जखमी झाली. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. पोलीस या अपघाताची सखोल चौकशी करत आहेत. या दुर्दैवी अपघाताचे कारण कार चालकाला झोप लागल्याचं सांगण्यात येत आहे. कुटुंबीयांच्या मते, दुचाकी वाचवण्याचा प्रयत्न करताना कार डिव्हायडरला धडकली, खड्ड्यात पडली आणि आग लागली. या अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे.

एसपी तेजवीर सिंह म्हणाले की, सकाळी जहांगीराबाद पोलीस ठाण्यात माहिती मिळाली की जहांगीराबाद अनुपशहर रस्त्यावरील जानीपूर गावाजवळ एक स्विफ्ट कार एका डिव्हायडरला धडकली आणि खड्ड्यात पडली. या माहितीवरून पोलीस घटनास्थळी पोहोचले. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर एका जखमी महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत आणि तिची प्रकृती धोक्याबाहेर आहे. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कृषीमंत्री दत्तात्रय भरणे अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर..

Kalyan Crime : नर्सिंगच्या विद्यार्थिनीवर ५ महिने सामूहिक बलात्कार, 'त्या' व्हिडीओमुळे ८ जणांच्या काळ्या कृत्याचा भंडाफोड

Uddhav Thackeray: मुंबईत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शेकडो कार्यकर्त्यांनी सोडली साथ; भाजपमध्ये प्रवेश

Mumbai Fire : कांदिवलीतल्या चाळीत अग्नि तांडव, ७ जण होरपळले, गॅस सिलिंडरच्या लिकेजमुळे उडाला भडका

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची बातमी! आधार कार्डशिवाय ₹१५०० विसरा, e-KYC करण्याआधी वाचा

SCROLL FOR NEXT