Police Suspended Saam Tv
देश विदेश

Police Suspended: ९ पोलिसांचे तडकाफडकी निलंबन, पोलिस दलात खळबळ

Kaushambi Firecracker Factory Blast: उत्तर प्रदेशमध्ये फटाक्याच्या कारखान्यात मोठा स्फोट झाला होता. या स्फोटामध्ये १५ जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आता मोठी कारवाई करण्यात आली.

Priya More
  • कौशांबी फटाका कारखाना स्फोटप्रकरणी मोठी कारवाई

  • प्रशासनाने कारवाई करत ९ पोलिसांचे निलंबन केली

  • बेकायदेशीर फटाका कारखाना स्फोटात १५ जणांचा मृत्यू

  • कौशांबी स्फोटानंतर पोलिसांवर निष्काळजीपणा केल्याप्रकरणी कारवाई

उत्तर प्रदेशच्या कौशांबी येथे फटाक्यांच्या काखान्यात भीषण स्फोट झाला. या स्फोटामधील मृतांचा आकडा १५ वर पोहचला आहे तर अनेक जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कौशांबी येथे लोकवस्तीत हा फटक्यांचा कारखाना बेकायदेशीररित्या चालवला जात होता. या प्रकरणात आता प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे. निष्काळजीपणा केल्याप्रकरणी ९ पोलिसांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली.

कौशांबी येथे फटाक्याच्या कारखान्यात सोमवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास स्फोट झाला होता. या स्फोटात १५ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये १० मुलांचा समावेश आहे. त्याचसोबत चार पुरूष आणि एका महिलेचा मृत्यू झाला असून हे चार मृत एकाच कुटुंबातील आहेत. दोन कुटुंबातील तीन सदस्यांचा समावेश आहे. गंभीर जखमी झालेल्यांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून अनेक जण व्हेंटिलेटरवर आहे.

या प्रकरणात निष्काळजीपणा केल्याप्रकरणी ९ पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. निष्काळजीपणाप्रकरणी एक पोलिस निरीक्षक, ६ पोलिस उपनिरीक्षक आणि २ हवालदार यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. पोलिस महानिरीक्षक अजय कुमार मिश्रा यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. गेल्या २ वर्षांपासून पिपरी पोलिस ठाण्यात आणि चौकीवर तैनात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.

बुंदीगावात असलेला हा फटाक्याचा कारखाना बेकायदेशीररित्या चालवण्यात येत होता. हा कारखाना लोकवस्तीच्या अगदी शेजारीच होता. घटनेच्या वेळी कारखान्यात २० कामगार काम करत होते. घटनास्थळावरच ७ जणांचा मृत्यू झाला होता. काही जखमींनी उपचारादरम्यान प्राण सोडले. या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या मृतदेहाची ओळख पटवणे पोलिसांसाठी एक आव्हान बनले होते. पण नंतर मृतांची ओळख पटली. या स्फोटामुळे कारखान्याच्या आसपासच्या घरांची पडझड झाली. त्यामुळे मोठे नुकसान झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Late night sleeping: रात्री झोपण्याची योग्य वेळ कोणती? रात्री जागणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचे

Maharashtra News Live Update: उंबरडे डंपिंग ग्राउंडवर ठेकेदाराच्या कामाचा भांडाफोड; सुपरवायझरला मारहाण

देशातील हा दुसरा स्वातंत्र्य लढा; महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी असं का म्हणाले?

Congress Protest Live Update : काँग्रेसच्या आंदोलनावर किरेन रिजिजू यांची टीका; म्हणाले, ‘काँग्रेस दिशाहीन’

Nagpur Fort : नागपूरजवळ लपलाय ३०० वर्षांचा ऐतिहासिक वारसा, कैद्यांसाठी तुरुंग बनलेला विदर्भातील 'हा' किल्ला पाहिलात का?

SCROLL FOR NEXT