Donald Trump Saam Tv
देश विदेश

India-Pakistan: भारत पाकिस्तानातील तणाव वाढला; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय

India-Pakistan Tensions Rise: भारत आणि पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या तणावाचा शांत मार्गाने शेवट व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Bhagyashree Kamble

भारत आणि पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सलग तिसऱ्या दिवशी पाकिस्तानकडून भारतातील विविध भागांवर ड्रोन हल्ले सुरू आहेत. शस्त्रसंधीचे उल्लंघन, क्षेपणास्त्र हल्ले, गोळीबार, याला भारतानेही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भारतीय हवाई दल सतर्क असून, पाकिस्तानकडून येणारे सर्व हल्ले हाणून पाडले जात आहेत.

यामुळे दोन्ही देशातील तणाव वाढल्याची परिस्थिती पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेने पुन्हा आपली भूमिका स्पष्ट केली आहे. व्हाइट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी सांगितले की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या तणावाचा शांत मार्गाने शेवट व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या दोन्ही देशाच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेची प्रतिक्रिया समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशातील तणाव शक्य तितक्या लवकर कमी करण्याचे आवाहन दोन्ही देशांना दिले. यासाठी परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सतत दोन्ही देशांच्या संपर्कात असल्याची माहिती त्यांनी दिली.

फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत, अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी स्पष्ट केले की, या प्रकरणात अमेरिका थेट हस्तक्षेप करणार नाही, पण दोन्ही देशांनी राजनैतिक मार्गाने तणाव कमी करावा, अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. तसेच त्यांनी, 'अमेरिका कोणत्याही लष्करी करावाई सहभागी होणार नाही. या युद्धाचे रूपांतर युद्धात किंवा आण्विक संघर्षात होऊ शकते', अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.

पाकिस्तानच्या कुरघोड्या सुरूच

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानच्या नांग्या ठेचल्या. या कारवाईनंतर पाकिस्तान पेटला असून, त्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत सीमेवरील निवासी भागांना लक्ष्य करत गोळीबार आणि भारतीय लष्करी तळांवर ड्रोन हल्ल्यांचे प्रयत्न केले. मात्र, भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने हे हल्ले हाणून पाडले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

टीम इंडियाची विजयी गर्जना! चौथा सामना रद्द, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्यात बाजी मारली; टी-२० मालिकेत ऐतिहासिक यश

Saturday Horoscope : आयुष्यात मोठं काही तरी घडणार; ५ राशींच्या लोकांना दिवसभरात खटाखट पैसे मिळणार

छोट्या पडद्यावरील 'युधिष्ठिर' बनावट जाहिरातीला फसले अन् गमावले हजारो रुपये; पोलिसांनी चक्रे फिरवत ठगांकडून अशी वसूल केली रक्कम

मुंबईच्या वेशीवर बिबट्याची धडक; मीरा भाईंदरमधील इमारतीत घुसून तरुणीवर हल्ला

बांग्लादेश पुन्हा पेटले, हिंदूची हत्या, विद्यार्थी नेत्याच्या हत्येनंतर हिंसाचार

SCROLL FOR NEXT