America School Firing Saam Tv
देश विदेश

Shocking: शाळेमध्ये अंदाधुंद गोळीबार, ३ विद्यार्थी आणि शिक्षकाचा मृत्यू

America School Firing: अमेरिकेतील शाळेमध्ये गोळीबाराची भयंकर घटना घडली. या घटनेत चौघांचा मृत्यू झाला. यामध्ये ३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

Priya More
  • अमेरिकेतील प्राथमिक शाळेत गोळीबाराची घटना घडली

  • या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला

  • मृतांमध्ये ३ विद्यार्थी आणि एका शिक्षकाचा समावेश आहे

  • गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला

  • ओरेगॉन शाळेतील गोळीबारात दोन जण गंभीर जखमी

अमेरिकेमध्ये गोळीबाराची थरारक घटना घडली. अमेरिकेच्या ओरेगॉन राज्यातील एका प्राथमिक शाळेत गुरुवारी अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. या गोळीबारामध्ये ३ विद्यार्थी आणि शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. गोळीबारामध्ये अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शाळेमध्ये झालेल्या या रक्तरंजित थरारामुळे परिसर हादरून गेला. गोळीबाराचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिस सध्या तपास करत आहेत. शाळेचा परिसर सील करण्यात आला आहे.

पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, स्थानिक वेळेनुसार दुपारी १ वाजताच्या सुमारास पोलिसांना गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळाली. अवघ्या २ मिनिटांत पोलिस घटनास्थळी पोहचले. गोळीबार करणारा आरोपी देखील मृतावस्थेत आढळून आला. त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्याला कुणी मारले हे स्पष्ट नाही. पण कदाचित एखाद्या उपस्थित व्यक्तीने हे कृत्य केले असावे, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

सिल्व्हर रेल प्राथमिक शाळेत ही घटना घडली. या घटनेनंतर शाळा सील करण्यात आली. शाळेच्या विद्यार्थ्यांना बसमधून दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. विद्यार्थ्यांना त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात आले आहे अशी माहिती पोलिसांनी दिली. तीन विद्यार्थी आणि एका शिक्षकासह चार जणांचा या गोळीबारामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

या गोळीबाराच्या घटनेमध्ये दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. ज्या शाळेमध्ये ही गोळीबाराची घटना घडली ती शाळा अमेरिकेतील पोर्टलँड शहराच्या आग्नेय दिशेला सुमारे २७० किलोमीटर अंतरावर आहे. अमेरिकेत गोळीबाराच्या घटना सतत घडत आहेत. या वर्षी आतापर्यंत ३६० हून अधिक सामूहिक गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माहूर घाटात टेम्पो दरीत कोसळला, ३ भाविकांचा मृत्यू, ५ गंभीर; रेणुका मातेचे दर्शन घेऊन येताना काळाचा घाला

Brown Egg Vs White Egg: तपकिरी की सफेद, कोणती अंडी आरोग्यासाठी सर्वात पौष्टिक?

Maharashtra News Live Update: अल्पसंख्यांक संस्थांना पवित्र पोर्टल द्वारे नियुक्त करणे बंधनकारक नाही, हायकोर्टाचा निर्णय

Petrol Diesel : दिवाळीआधी केंद्र सरकारचा मोठा निर्णय! पेट्रोल-डिझेलच्या टॅक्समध्ये बदल; तुमच्या खिशावर होणार का परिणाम?

Musician Death: संगीत विश्वाला मोठा धक्का! प्रसिद्ध संगीतकाराची हृदयविकाराच्या झटक्याने निधन

SCROLL FOR NEXT