Maharashtra News : ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय आणि डिजिटल सेवा गावातच उपलब्ध होणार

Maharashtra PACS Societies Update : महाराष्ट्रातल्या प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांना (PACS) आता ‘आपले सरकार सेवा केंद्र’ म्हणून मान्यता देण्यात येणार आहे.
Maharashtra News
Maharashtra News meta ai
Published On: 

राज्यातल्या ग्रामीण भागातील नागरिकांना विविध शासकीय सेवा आणि डिजिटल सुविधा गावातच उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. यासाठी राज्यातील प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था (Primary Agricultural Credit Societies – (पॅक्स) PACS) यांना ‘आपले सरकार सेवा केंद्र’ म्हणून मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे माहिती इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभाग मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले.

ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पॅक्स संस्था यापूर्वीच डिजिटल पेमेंट, विमा नोंदणी, पेन्शन योजना, युटिलिटी बिल संकलन, तिकीट सेवा, कृषी सल्ला अशा विविध डिजिटल सेवा ग्रामीण नागरिकांना पुरवत आहेत. या संस्थांचे ग्रामीण भागात मोठे जाळे असल्यामुळे त्यांना ‘आपले सरकार सेवा केंद्रा’चा दर्जा दिल्याने ग्रामीण नागरिकांना विविध शासकीय सेवा सहज आणि सुलभपणे उपलब्ध होणार असल्याचे मंत्री ॲड.शेलार यांनी सांगितले.

Maharashtra News
Car & Bike Insurance Rules : सिग्नल तोडणाऱ्यांनो सावधान! आता इन्शुरन्ससाठी मोजावे लागतील जास्त पैसे?

केंद्र शासनाच्या सहकार मंत्रालयाच्या निर्देशानुसार पॅक्स संस्थांना राज्य शासनाच्या सेवांच्या वितरणासाठी अधिकृत संस्था म्हणून नियुक्त करण्याबाबत राज्यांना सूचित करण्यात आले होते. त्यानुसार मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या माहिती तंत्रज्ञानविषयक उच्चाधिकार समितीच्या बैठकीत पॅक्स संस्थांना ‘आपले सरकार सेवा केंद्रा’चा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला.

Maharashtra News
PM Kisan Yojana: पीएम किसानचे पैसे पती-पत्नी दोघांना मिळतात का? वाचा काय सांगतो खरा नियम

या निर्णयानुसार पात्र पॅक्स संस्थांना आवश्यक लॉगिन क्रेडेन्शियल्स उपलब्ध करून देण्यासाठी 10 हजार रुपये अनामत रक्कम भरणे आवश्यक राहणार आहे. तसेच केंद्र चालविण्यासाठी आवश्यक जागा, संगणक, प्रिंटर, बायोमेट्रिक उपकरणे, इंटरनेट जोडणी, वीजपुरवठा, बॅकअप सुविधा, फर्निचर आणि नागरिकांसाठी प्रतीक्षा व्यवस्था यांसारख्या पायाभूत सुविधा संस्थेकडे असणे आवश्यक आहे. संबंधित संस्थांना शासनाने निर्धारित केलेल्या नियमांचे व कार्यपद्धतीचे पालन करण्याबाबत लेखी हमी द्यावी लागणार आहे. सेवा शुल्क, केंद्राची ब्रँडिंग, नागरिकांना सेवा पुरविण्याच्या अटी, माहिती सुरक्षा, नोंदवही ठेवणे तसेच शासनाच्या वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक असेल.

आपले सरकार सेवा केंद्राचा दर्जा मिळविण्यासाठी पात्र पॅक्स संस्थांनी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाकडे विनंती अर्ज सादर करणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून संस्थेची आवश्यक माहिती व अनामत रकमेच्या भरण्याबाबतची तपासणी करून प्रस्ताव महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ (महाआयटी) यांच्याकडे पाठविण्यात येईल. त्यानंतर संबंधित संस्थांना लॉगिन क्रेडेन्शियल्स उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करण्यात येईल. एका क्षेत्रासाठी एकापेक्षा अधिक पात्र अर्ज प्राप्त झाल्यास, लागू असलेल्या पात्रता व निवड निकषांच्या अधीन राहून एका पॅक्स संस्थेला प्राधान्य देण्याबाबत सहकार विभाग निर्णय घेईल.

या निर्णयामुळे ग्रामीण भागातील सहकारी संस्थांचे डिजिटल सक्षमीकरण होण्याबरोबरच नागरिकांना विविध शासकीय सेवा मिळविण्यासाठी शहरांकडे किंवा तालुक्याच्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता कमी होणार आहे. तसेच सहकार क्षेत्राच्या माध्यमातून ग्रामीण भागात डिजिटल सेवा वितरणाचे जाळे अधिक व्यापक आणि सक्षम करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मंत्री ॲड.शेलार यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.