US President Donald Trump Imposes 25% Tariff on Indian Imports Saamtv
देश विदेश

Tariff : ट्रम्पचा धक्का, भारताला फटका? कोण-कोणत्या उद्योगांवर होणार परिणाम, जाणून घ्या

US President Donald Trump Imposes 25% Tariff on Indian Imports: तेल आणि संरक्षण क्षेत्रात भारताचे रशियासोबत वाढत्या व्यापारी संबंधांचे कारण देत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर २५% आयात शुल्क लादले आहे. या निर्णयामुळे अमेरिका आणि भारत यांच्यात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

Bharat Mohalkar

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भारत आणि रशियाची मैत्री चांगलीच खटकलीय.. भारत रशियाकडून खनिज तेल आणि शस्त्रांचा व्यापार करत असल्याने अमेरिकेने आयात शुल्काच्या माध्यमातून भारताला तब्बल 25 टक्के दंड ठोठावण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे भारताचं टेन्शन वाढलंय.

आयात शुल्काबाबत काय म्हणाले ट्रम्प ?

अनेक वर्षांपासून भारतासोबत मैत्रीपूर्ण संबंध, मात्र व्यापार कमी

भारत जगात सर्वाधिक आयात शुल्क लादणारा देश

भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात लष्करी साहित्य, कच्चं तेल विकत घेतो

रशियाने युक्रेनच्या नागरिकांना मारणं थांबवावं असं वाटत असेल तर हे योग्य नाही

त्यामुळे 1 ऑगस्टपासून भारताला 25 % आयात शुल्कासोबत अतिरिक्त दंड लावण्याचा निर्णय

खरं तर 2 एप्रिलला अमेरिकेने भारतावर लावलेलं 27 टक्के टॅरिफ मागे घेतलं. त्यानंतर भारताने अमेरिकेसोबत चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी आडमुठपणाने रशियासोबतचा व्यापार थांबवला तरच भारताला टॅरिफमधून सुट देण्याची भूमिका घेतली. मात्र भारताने पारंपरिक मित्र असलेल्या रशियासोबतचा व्यापार कायम ठेवला आणि हिच गोष्ट ट्रम्प यांना खटकली. त्यामुळेच ट्रम्प यांनी भारताला धक्का दिलाय.

ट्रम्पचा धक्का, भारताला फटका?

भारताची अमेरिकेत 124 अब्ज डॉलरचा व्यापार

भारताकडून कापड, औषधं, रसायने, IT सेवेची 81 अब्ज डॉलरची निर्यात

भारताकडून अमेरिकेला 28 टक्के कापडाची निर्यात

औषधं, IT सेवा, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं, दागिने, ऑटोमोबाईल्स पार्टसवर परिणाम

रशियाकडून भारताला सवलतीच्या दरात कच्चं तेल मिळतं. त्यामुळे भारत रशियातून तब्बल 35 टक्के खनिज तेल आयात करतो. मात्र आता अमेरिकेने भारताची कोंडी केल्याने सरकार अलर्टवर आलंय. तर वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी उच्चस्तरीय बैठक घेतलीय. त्यामुळे आता भारत अमेरिकेच्या दबावापुढे झुकणार की आपला कणखर बाणा कायम ठेवत नवे पर्याय शोधणार? याकडे जगाचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amanjot Kaur Direct Throw: वाह भाई वाह! अमनजोत कौरचं गजब क्षेत्ररक्षण; धाव चोरणाऱ्या खेळाडूच्या दांड्या केल्या गुल, Video Viral

Shocking : काँग्रेस नेत्याचा रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह; कुटुंबीयांना हत्येचा संशय

ऑफिस आम्हाला परत द्या! काँग्रेस कार्यकर्त्यांचा BRSच्या कार्यालयावर हल्ला; खुर्च्या, फर्नीचरला लावली आग

Maharashtra Politics: पोटात अन्न नाही, डोक्यात हॉटेलवरून उडी मारण्याचा विचार, बंड करणाऱ्या आमदारानं सांगितला गुवाहाटीचा भयानक किस्सा|VIDEO

Maharashtra Live News Update: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण झाल्याने ऊर भरून आलंय : विखे-पाटील

SCROLL FOR NEXT