Amit Shah Saam Tv
देश विदेश

राज्यसभा निवडणुकीपूर्वी धमाका; 'हा' पक्ष भाजपमध्ये विलीन होणार? दिल्लीत हालचालींना वेग

Rajya Sabha election process India : राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपेंद्र कुशवाहा यांच्या राष्ट्रीय लोक मोर्चा पक्षाच्या भाजपमध्ये विलीनीकरणाची चर्चा रंगली आहे. दिल्लीत वरिष्ठ नेतृत्वासोबत बैठका झाल्याने बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Namdeo Kumbhar

देशाच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारमधील एक मोठा राजकीय पक्ष भाजप विलीन होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दिल्लीतील राजकीय वर्तुळात या हालचालींना प्रचंड वेग आला असून लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. राज्यसभेच्या आगामी जागा जिंकण्यासाठी आणि संसदेत आपले संख्याबळ भक्कम करण्यासाठी भाजप हा मास्टरस्ट्रोक खेळण्याच्या तयारीत आहे. या विलीनीकरणामुळे भाजपची ताकद आणखी वाढणार आहे. दरम्यान, RLM किंवा भाजपने विलीनीकरणावर अधिकृतपणे कोणत्याही प्रतिक्रिया अथवा दुजोरा दिलेला नाही.

बिहारमधील दिग्गज नेते आणि माजी केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाहा यांचा राष्ट्रीय लोक मोर्चा (RLM) हा पक्ष भाजपमध्ये विलीन होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत हालचालींना वेग आला आहे, लवकरच याबाबत मोठा निर्णय होऊ शकतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उपेंद्र कुशवाहा यांनी काल रात्री भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाशी भेट घेतली. या महत्त्वाच्या बैठकीत राज्यसभेची उमेदवारी आणि RLM पक्षाचे भविष्य यावर चर्चा झाली.

बिहार विधानसभेत २४३ सदस्य आहेत. राज्यसभा निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवाराला ४१ आमदारांचा पाठिंबा अनिवार्य आहे. भाजप प्रणीत एनडीएकडे बहुमतापेक्षा जास्त जागा आहेत, त्यामुळे ४ जागा सहज जिंकू शकतात. पण पाचव्या जागेसाठी समीकरण गुंतागुंतीचे आहे. त्यामुळे उपेंद्र कुशवाह यांना राज्यसभेसाठी निवडून आणले जाऊ शकते. राज्यसभेच्या जागेसोबतच राष्ट्रीय लोक मोर्चा हा पक्ष भाजपात विलीन करण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे.

वरिष्ठ नेतृत्वासोबतच्या बैठकीत काय झाले?

सोमवारी रात्री उशिरा, राष्ट्रीय लोक मोर्चा (आरएलएम) अध्यक्ष उपेंद्र कुशवाहा यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेतली. या बैठकीत बिहारमधील आगामी राज्यसभा निवडणुकीबाबत सविस्तर चर्चा झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उपेंद्र कुशवाहा यांनी भाजपला दिलेल्या त्यांच्या पूर्वीच्या आश्वासनानुसार स्वतःसाठी राज्यसभेची जागा आणि त्यांचा मुलगा दीपक प्रकाशसाठी एमएलसीची जागा मागितली आहे. त्यांना राज्यसभेची निवडणूक भाजपच्या चिन्हावर नव्हे तर त्यांच्या पक्षाच्या आरएलएमवर लढवायची आहे. भाजप हायकमांडला या प्रस्तावावर कोणताही आक्षेप नाही. बिहारमधील भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने आरएलएमचे भाजपमध्ये विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव दिला असला तरी, सध्या हे विलीनीकरण होणार नाही असे समजतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asian Games 2026 : भारतीय महिला कबड्डी संघानं इतिहास रचला; एशियन गेम्समध्ये गोल्ड मेडलवर कोरलं नाव, ईराणला नमवलं

Maharashtra News Live Update: पंढरपुरात कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासाठी राष्ट्रवादीचा तहसील कार्यालयावर मोर्चा

Gyanesh kumar : ज्ञानेश कुमारांविरोधात मुंबईत ठाकरेंचं वादळ; ४ ऑक्टोबरला शिवसेना-मनसेचा महामोर्चा

Hair Care: हेअर फॉल होईल कमी, फक्त ३ आठवडे कांद्याचा रस लावून पाहा, केस होतील मजबूत आणि घनदाट

२६५ तालुक्यात दुष्काळ, पंचनाम्याला सुरूवात; देवेंद्र फडणवीसांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वाचे आदेश

SCROLL FOR NEXT