Hazratganj Accident Saam Tv
देश विदेश

Hazratganj Accident: लखनऊमध्ये भिंत कोसळून 9 मजुरांचा मृत्यू; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

२४ तासांपासून सुरू असलेल्या पावसामुळे एका घराची भिंत कोसळली.

वृत्तसंस्था

लखनऊ - उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये (Lucknow) एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथील हजरतगंज परिसरात २४ तासांपासून सुरू असलेल्या पावसामुळे एका घराची भिंत कोसळली. या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला आहे.अनेक लोक या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेत दोन मुलांचाही मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त करत चार लाख रुपयांची मदत देण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

ढिगाऱ्याखाली अडकल्या लोकांना तातडीने बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. दिलकुशा कॉलनीजवळ घराची भिंत कोसळली आहे. लखनऊ पूर्वच्या डीसीपी प्राची सिंह यांनी सांगितले की, या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन महिला, तीन मुले आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. लखनऊमध्ये मुसळधार पावसामुळे हा अपघात झाला. मृत्यू झालेले सर्व लोक मजूर असल्याचे सांगण्यात येत आहे. ते भिंत बांधण्याचे काम करत होते. याठिकाणी बरेच दिवस बांधकाम सुरू होते.

हे देखील पाहा -

घटनास्थळी मजुरांच्या पिशव्या, भांडी, गणवेश विखुरले होते. काही दिवसांपूर्वी मजुरांनी त्यांच्या कुटुंबीयांनाही बोलावून घेतले होते. मजुरांचे संपूर्ण कुटुंब येथे राहत होते. यात एक मजूर गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचून बचावकार्य करत आहे. लष्कराचे जवानही घटनास्थळी हजर आहेत. लखनऊच्या दिलकुशा कॉलनीत हा अपघात झाला.

हजरतगंज परिसरात अनेक जुनी घरे असून, कोसळलेले घर हे 100 वर्षे जुने असल्याचे सांगितले जात आहे. या संपूर्ण परिसरात छोट्या-छोट्या गल्ल्या असून, त्यामुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत. सध्या घटनास्थळी मदत आणि बचावकार्य युद्धापातळीवर सुरू करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heavy Rain : मुसळधार पाऊस; वारणा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग, कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ

Kumbh Rashi : कुंभ राशीचा आजचा रविवार जाणार कसा? वाचा स्पेशल राशीभविष्य

Rohini Khadse: कोण आहे रोहिणी खडसे? जाणून घ्या त्यांच्याविषयी

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

SCROLL FOR NEXT