नागपूर - जिल्ह्यात जनावरांना होणाऱ्या 'लम्पी' (Lumpy Diesease) आजाराचा धोका वाढत चालला आहे. या आजाराची जिल्ह्यातील 20 जनावरांना लागण झाली असून एका जनावराचा मृत्यु झाला आहे. लम्पी आजाराचा प्रादुर्भाव विचारात घेऊन या रोगावर तातडीने नियंत्रण आणण्यासाठी राज्य शासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.
हिंगणा आणि सावनेर तालुक्यातील जुनेवानी, उमरी आणि बडेगाव याठिकाणी 20 जनावरांना या आजाराची लागण झाली आहे. प्रशासनाने या गावाच्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या जनावरांचे लसीकरण सुरू केले आहे. आतापर्यंत 3 हजार 632 जनावरांचे लसीकरण झाले आहे. डॉक्टर आणि तज्ज्ञांच्या 20 चमू तयार केल्या असून या आजाराच्या नियंत्रणासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली आहे.
हे देखील पाहा -
देशात अनेक राज्यांमध्ये याचा कहर वाढत असून पशूपालन वर्गावर पुन्हा एकदा चिंतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. हा आजार त्वचेच्या विकारासंबंधी असून अधिक गायींना या आजाराची लागण झाली आहे.
लम्पी त्वचा रोग नेमका काय आहे ?
लम्पी हा आजार प्रामुख्याने त्वचेचा (Skin) संसर्गजन्य असून त्याचा प्रामुख्याने जनांवरांमध्ये दिसून येत आहे. हा रोग सध्या किटकांपासून पसरतो. माश्या आणि डासांच्या विशिष्ट प्रजाती तसेच उवांमुळे हा रोग पसरतो. या आजारांत जनावरांच्या शरीराला गाठी येतात आणि पुढे गाठींचा आकार मोठ होत जातो. हा व्हायरस जास्त दुसऱ्या जनावरांमध्ये संक्रमीत होण्याची शक्यता अधिक आहे.
या आजाराची लक्षणे -
या आजारात जनावरांना प्रथम ताप येतो. त्यांचे वजन कमी होते, जनावरांच्या डोळ्यांतून सतत पाणी येऊ लागते, तोंडातून लाळ पडते, शरिरावर छोट्या गाठी यायला लागतात. जानावर दूध कमी देते, यामुळे जनावरांची प्रकृती अधिक जास्त खराब होते.
लम्पी व्हायरसवर उपाय
- लम्पीची लागण झालेल्या जनानरांना वेगळे ठेवा.
- माश्या, डास, गोचीड यांना मारण्याचे उपाय शोधा. तसेच हे जनावरांच्या आजूबाजूला फिरणार नाही याची काळजी घ्या.
- जनावरांचा मृत्यु झाल्यास मृतदेह मोकळ्या जागेवर न सोडता पुरून टाकावा किंवा जाळून टाकावा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.