Police investigate hotel room in Kanpur where Congress leader’s son was found hanging under mysterious circumstances. saam tv
देश विदेश

मैत्रीण रुमच्या बाहेर पडली अन्...; कॉंग्रेस नेत्याच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू, हॉटेलमध्ये आढळला मृतदेह, काय घडलं?

Kanpur Hotel Suspicious Death Of Congress Leader Son Full Story: कानपूरमधील हॉटेलमध्ये काँग्रेस नेत्याच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू. महिला मित्राला सोडल्यानंतर खोलीत परतल्यानंतर गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला.

Omkar Sonawane

उत्तरप्रदेश: कानपूर येथील एका हॉटेलमध्ये शनिवारी सकाळी काँग्रेसच्या नेत्याच्या मुलाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. तो शुक्रवारी दुपारी आपल्या मैत्रिणीसोबत हॉटेलमध्ये गेला होता. संध्याकाळी तिला बाहेर सोडून तो पुन्हा खोलीत परतला होता. मात्र, कुटुंबियांच्या म्हणण्यांनुसार चादरीच्या सहाय्याने पंख्याला लटकलेल्या अवस्थेत त्याचे पाय गुडघ्याजवळ वाकलेले होते. त्यामुळे त्याची हत्या करून मृतदेह लटवण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

कर्नलगंज येथील तलाक महल भागात राहणारे हाजी मोहम्मद फजल खान हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या कुटुंबात पत्नी शाहदाब, विवाहित मुलगी अंबर आणि 32 वर्षीय मुलगा गयास असा परिवार आहे. गयासने पुण्यातून बीटेक शिक्षण घेतले होते आणि सध्या तो दिल्लीतील एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. शुक्रवारी तो मित्रांसोबत बाहेर जात असल्याचे सांगून घरातून निघाला होता आणि रात्री परतणार नसल्याचेही सांगितले होते.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गयासने शुक्रवारी साकेतनगर येथील हॉटेलमध्ये खोली बुक केली होती. शनिवारी सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत दरवाजा न उघडल्याने हॉटेल कर्मचाऱ्यांनी दरवाजा ठोठावला. प्रतिसाद न मिळाल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली. मास्टर कीच्या साहाय्याने दरवाजा उघडल्यावर गयासचा मृतदेह चादरीच्या साहाय्याने पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांनी हॉटेल कर्मचाऱ्यांसह कुटुंबीयांचीही चौकशी केली आहे. किदवईनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी विजय सिंह यांनी सांगितले की, मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला असून प्राथमिक तपासात आत्महत्येची शक्यता वर्तवण्यात येत आहे. खरी माहिती पोस्टमार्टम अहवालानंतरच स्पष्ट होईल.

मैत्रिणीला सोडल्यानंतर ऑनलाइन जेवण मागवले होते

हॉटेल व्यवस्थापक सौरभ कुमार यांच्या माहितीनुसार, गयास शुक्रवारी दुपारी एका मैत्रिणीसओबत हॉटेलमध्ये आला होता. संध्याकाळी साडेसातच्या सुमारास तो तिला सोडण्यासाठी बाहेर गेला आणि काही वेळाने पुन्हा आपल्या खोलीत परतला. त्याने रात्री ऑनलाइन जेवणही मागवले होते. घटनास्थळावरून मद्याची बाटली आणि सिगारेटचे पाकीटही जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी हॉटेलची डीव्हीआरही ताब्यात घेतली असून फुटेजच्या आधारे महिला मित्राचा शोध घेतला जात आहे. तिचीही चौकशी केली जाणार आहे. पुढील कारवाई पोस्टमार्टम अहवालानंतर करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बारामतीत पावसाला सुरूवात, नागरिकांची उडाली तारांबळ

Mumbai Crime: मुंबईमध्ये रक्तरंजित थरार! भरदिवसा चौघांवर जीवघेणा हल्ला, चाकूने सपासप वार; एकाचा जागीच मृत्यू

शत्रूंपासून सावध राहा, किरकोळ खर्च टाळा; ५ राशींच्या लोकांना मोठ्या संकटाना सामोरे जावे लागणार

Beed Crime: तू माझ्याशी का नाही बोलत? चारित्र्याच्या संशयावरून तरुणीवर जीवघेणा हल्ला; घरात घुसून चाकूने सपासप वार, परळी हादरले

Varanasi : मांस विक्री व्यवसायावर मोठा बदल; टप्प्याटप्प्याने दुकाने शहराबाहेर हलवणार, कुठे आणि का?

SCROLL FOR NEXT