Smriti Irani Corona Positive Latest News in Marathi saam Tv
देश विदेश

Smriti Irani: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना कोरोनाचा संसर्ग, ट्विट करून दिली माहिती

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना दुसऱ्यांदा कोरोना झाला आहे.

साम ब्युरो

नवी दिल्ली: दिल्लीसह देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत असल्याचे दिसते. आता केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनाही कोरोनाचा (corona) संसर्ग झाला आहे. केंद्रीय मंत्री इराणी यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली.

देशभरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. दिल्ली आणि महाराष्ट्रात पुन्हा नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. कोरोनाची चौथी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कोरोनाचा (Coronavirus) विळखा घट्ट होत आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. स्मृती इराणी यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे. त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

'राजेंद्र नगरमध्ये आयोजित कार्यक्रमात सहभागी होऊ शकले नाही. त्यामुळे मी तेथील नागरिकांची माफी मागते. कारण माझा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे,' असं स्मृती इराणी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. राजेंद्र नगरमधील नागरिकांना आवाहन करते की, त्यांनी राजेश भाटिया यांना आपले मत द्यावे आणि त्यांचा विजय निश्चित करावा, असेही त्यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.

दरम्यान, दिल्लीच्या राजेंद्र नगर विधानसभा मतदारसंघासाठी २३ जून रोजी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणूक प्रचारासाठी स्मृती इराणी (Smriti Irani) जाणार होत्या. मात्र, कोरोना चाचणीचा अहवाल हा पॉझिटिव्ह आल्याने त्या रॅलीत सहभागी होऊ शकल्या नाहीत. त्या सध्या विलगीकरणात आहेत.

राजेंद्र नगरमध्ये राजेश भाटिया यांच्या प्रचारासाठी भाजपकडून मिनाक्षी लेखी, खासदार मनोज तिवारी, प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता यांनी रोड शो केला. या रोड शोमध्ये केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या देखील सहभागी होणार होत्या. स्मृती इराणींना दुसऱ्यांदा कोरोनानं गाठलं आहे. यापूर्वी २०२० मध्ये इराणी यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता.

Edited By - Nandkumar Joshi

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पंढरपुरात कालव्यातील पाण्याची नासाडी

5 Potato Recipe: नवरात्रीच्या उपवासासाठी स्पेशल रेसिपी! बटाट्यापासून बनवा 5 उपवासाचे पदार्थ

Hair Fall: केसगळती आणि केस तुटण्याची समस्या होईल कमी; आठवड्यातून २ वेळा लावा हे घरी बनवा खास तेल

Navratri Fasting Recipe : नवरात्रीत उपवासाला गोड खाण्याची मजाच वेगळी, 'असा' बनवा मऊसूत रताळ्याचा शिरा

Congress Protest Live Update : इंडिया आघाडीच्या मोर्चाला सुरूवात, दिल्लीतील वातावरण तापले

SCROLL FOR NEXT