Maharashtra Covid Update : नागरिकांना दिलासा नाहीच! नवीन कोरोना रुग्णसंख्या टेन्शन वाढवणारी

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. आज राज्यात एका दिवसात ४००४ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.
File Photo
File PhotoSaam Tv

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. आज राज्यात एका दिवसात ४००४ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर राज्यात ३ हजार ८५ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात बरे होण्याचे प्रमाण ९८.८४ टक्के आहे. काही महिन्यांपासून कोरोनाचे (Corona) रुग्ण कमी झाले होते, आता पुन्हा रुग्णांत काही प्रमाणात वाढ होत आहे. (Maharashtra Covid Update In Marathi )

File Photo
नवापूर, नंदुरबार तालुक्यात पावसाचे आगमन; दमदार पावसाची प्रतीक्षाच

आज दिवसभरात एक कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.त्यामुळे कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या १,४७,८८६ इतकी झाली आहे. तर राज्यात सध्या २३, ७४६ इतके कोरोना रुग्ण सक्रिय आहेत.

मुंबई विभाग - मुंबई महापालिका (BMC) क्षेत्र, ठाणे, ठाणे महापालिका, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली महापालिका, उल्हासनगर महापालिका, भिवंडी निजामपूर महापालिका, मिरा भाईंदर महापालिका, पालघर, वसई-विरार महापालिका, रायगड, पनवेल महापालिका या परिसरात ३३५८ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.(Corona)

File Photo
शिवसेनेत गद्दारांना जागा नाही; उद्धव ठाकरेंचा इशारा

नाशिक विभाग - नाशिक (Nashik) , नाशिक महापालिका, मालेगाव महापालिका, अहमदनगर, अहमदनगर महापालिका, धुळे, धुळे महापालिका, जळगाव, जळगाव महापालिका, नंदुरबार आदी परिसरात कोरोनाचे ६० नवीन रुग्ण आढळले.

पुणे विभाग - पुणे महापालिका, पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका, सोलापूर, सोलापूर महापालिका, सातारा आदी क्षेत्रांत ४०८ नवीन कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत.

कोल्हापूर विभाग - कोल्हापूर, कोल्हापूर महापालिका, सांगली, सांगली महापालिका, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या क्षेत्रात ४३ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली.

औरंगाबाद विभाग - औरंगाबाद, औरंगाबाद महापालिका, जालना, हिंगोली, परभणी, परभणी महापालिका या भागांत ११ नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

लातूर विभाग - लातूर, लातूर महापालिका, उस्मानाबाद, बीड, नांदेड, नांदेड महापालिका या भागात १३ नवीन कोविडचा संसर्ग झालेले रुग्ण सापडले आहेत.

अकोला विभाग - अकोला, अकोला महापालिका, अमरावती, अमरावती महापालिका, यवतमाळ, बुलडाणा, वाशिम या परिसरात २४ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली.

नागपूर विभाग - नागपूर, नागपूर महापालिका, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, चंद्रपूर महापालिका, गडचिरोली आदी भागात ८७ नवीन कोरोनाबाधित आढळले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com