Arvind Sawant Vs Narayan Rane Saam tv
देश विदेश

Arvind Sawant Vs Narayan Rane: 'वैचारिक उंचीप्रमाणे नारायण राणे बोलले'; अरविंद सावंत यांची टीका

Vishal Gangurde

प्रमोद जगताप

Arvind Sawant News: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात अविश्वास ठरावावर चर्चा सुरू आहे. या अधिवेशनात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्यावर असंसदीय भाषेत टीका केली. नारायण राणे यांच्या टीकेला ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. '४ पक्ष सोडून आलेले म्हटल्यावर एवढा राग आला, त्यांच्या वैचारिक उंचीप्रमाणे राणे बोलले, अशा शब्दात अरविंद सावंत यांनी टीका केली. (Latest Marathi News)

अरविंद सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी सावंत यांनी नारायणे राणे यांच्यावर टीकास्त्र सोडलं. सावंत म्हणाले, 'आपल्या मर्यादा ओळखून बोललं पाहिजे. माझ्या आधीच्या वक्त्यांनी बोलताना भान ठेवलं पाहिजे. भगोडे म्हटल्यावर एवढा काय राग आला'.

' माझं भाषण संपताना नारायण राणे उभे राहिले आणि मला शिवसेनेत कधी आले विचारायला लागले. आपली आणि माझी तारीख बघा. आपण किती पक्ष सोडले ते पहा. चार पक्ष सोडून आल्यावर म्हटल्यावर एवढा राग आला, त्यांच्या वैचारिक उंची प्रमाणे नारायण राणे बोलले, अशी टीका सावंत यांनी केली.

'आजचा मणिपूरचा विषय गंभीर होता, त्यावर गोगाई यांनी सविस्तर मांडला. मुंबईची राजधानी खचून जात आहे. महाराष्ट्र आणि मुंबईतील माणसांनी हा विषय समजून घेतला पाहिजे. साडे नऊ वर्षात पंतप्रधान यांनी एक तरी पत्रकार परिषद घेतली का हे पाहिलं पाहिजे. हे लोकशाहीला मानत नाहीत, नुसती हुकूमशाही सुरू आहे, असेही ते म्हणाले .

तत्पूर्वी, 'एनडीए'च्या बैठकीवर अरविंद सावंत यांनी भाष्य केलं. 'त्यांना एकत्र येऊन बैठक घ्यायची घेऊद्या. एनडीएच्या बैठकीची कधी कधी आठवण नव्हती झाली. आम्ही 'इंडिया'ची बैठक घेतल्यावर यांनाही बैठक आठवली'. तसेच खासदार नवनीत राणा यांच्या प्रश्नावर अरविंद सावंत यांनी उत्तर देणे टाळले'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navratri 2024: नवरात्री स्पेशल उपवासाला बनवा बटाट्याचा शिरा; वाचा रेसिपी

KDMC News : पाणी मिळालं नाही, तर केडीएमसीला टाळे ठोकू; शिंदे गटातील नेत्याचा केडीएमसी अधिकाऱ्याला तंबी

Kalyan Crime : डिलिव्हरी बॉय, पण काम भयंकर, व्हिडिओ बघून सर्वच हैराण; CCTV पाहा

Jalgaon Religious Places : निसर्गाचं सानिध्य अन् भक्तीचा मेळ, जळगावातल्या धार्मिक स्थळांना भेट द्याच!

Bacchu Kadu: 'राज्याचा सातबारा नावावर आहे का?' बच्चू कडूंचा संजय राऊत, रोहित पवारांवर प्रतिहल्ला; २८८ जागा लढवण्याचीही घोषणा!

SCROLL FOR NEXT