Eye Flu in Maharashtra: नागरिकांनो काळजी घ्या! राज्यात डोळ्यांची साथ फोफावली; आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

Eye Flu in Maharashtra: राज्यात गेल्या काही दिवसांत २ लाख ४८ हजार ८५१ डोळे संसर्गाचे रुग्ण आढळून आले आहे.
Tanaji Sawant
Tanaji Sawant Saam tv

बालाजी सुरवसे

Eye Flu News Update: राज्यात डोळ्याच्या संसर्गाची साथ फोफावली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात डोळे संसर्गाचे साथ वाढली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांत २ लाख ४८ हजार ८५१ डोळे संसर्गाचे रुग्ण आढळून आले आहे. मुबंई,पुणे,ठाणे चंद्रपूर या जिल्ह्यात डोळ्याच्या संसर्गाचे रुग्ण अधिक प्रमाणात आढळून येत आहेत. यावरून (Latest Marathi News)

राज्यभरात डोळ्याच्या संसर्गाचे रुग्ण वाढू लागले आहेत. यामुळे डोळ्याची साथ लक्षात घेता आरोग्य कर्मचारी घरोघरी सर्वेक्षण करणार आहे. या आजाराच्या उपचारासाठी लागणारी आवश्यक औषध उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

संसर्गाचा प्रादुर्भाव पाहून मुलांची शाळांमध्येही तपासणी होणार आहे. मुबंई,पुणे,ठाणे, बुलढाणा, जळगाव, पुणे, नांदेड, अमरावती, अकोला राज्यात डोळ्याचे रुग्ण अधिक प्रमाणात आढळून आले आहेत.

Tanaji Sawant
Shiv Sena Political Crisis: शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकरच फैसला होणार; पुढच्या आठवड्यात सुनावणीला सुरुवात

राज्यात डोळ्यांची साथ मोठ्या प्रमाणात मुबंई,पुणे,ठाणे चंद्रपूर,गडचिरोली येथे रुग्ण संख्या जास्त प्रमाणात आढळून आल्याने आरोग्य विभागाची पथक तैनात करण्यात आले आहेत. डोळ्याबरोबर मलेरिया,चिकन गुणियाचे ही रुग्ण आरोग्य विभागाची पथक तैनात केल्याची माहिती आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी दिली आहे.

आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत म्हणाले, 'धारशिव - राज्यात डोळ्यांची साथ मोठ्या प्रमाणात असून मुबंई,पुणे,ठाणे चंद्रपूर, गडचिरोली येथे रुग्ण संख्या जास्त असून काळजीपोटी आरोग्य विभागाने पथक तैनात केली आहे. शाळेतील मुल असतील किंवा वयस्कर मानस यांची काळजी घेतली जात असून जास्त फैलाव होणार नसल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी केली आहे.

Tanaji Sawant
CM Eknath Shinde News : कोकणाच्या प्रगतीसाठी पायाभूत विकासाला प्राधान्य, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती

डोळ्या बरोबर मलेरिया, चिकन गुणियाचे ही रुग्ण असल्याचे तानाजी सावंत यांनी सांगितले आहे. नागरिकांनी या वाढत्या रुग्णाबाबत काळजी करू नये. आरोग्य विभागाची पथक तैनात करण्यात आली आहे, अशी माहितीही आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी धाराशिव मध्ये पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com