Shivsena Political Crsis: शिवसेना आमदार अपात्रेतबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या आमदाराची दररोज प्रत्येक आमदाराची प्रत्यक्ष सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे प्रत्यक्ष सुनावणी घेणार आहेत. (Latest Marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना आमदारांवरील अपात्रतेची कारवाई पुन्हा वेग घेणार आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटातील आमदारांची सुनावणी लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात शिंदे गटातील आमदारांची म्हणणं मांडण्याची मुदत संपणार आहे. याआधी विधानसभा अध्यक्षांनी २ आठवड्यांची मुदत दिली होती. (Maharashtra Latest News)
ठाकरे गटाच्या १४ आमदारांनी याआधीच लेखी उत्तर सादर केले होते, अशी माहिती विधीमंडळातील सूत्रांनी दिली आहे. यामुळे आता शिवसेनेच्या प्रत्येक आमदारांची सुनावणी होण्याची शक्यता आहे.
दोन्ही गटाच्या आमदारांची होणार सुनावणी
दरम्यान, शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटाच्या आमदारांचं लेखी उत्तर प्राप्त झाल्यानंतर प्रत्येक आमदारांची सुनावणी होणार आहे. ही सुनावणी ही ठाकरे गटाच्या आमदारांपासून होणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.