Pune Swabhimani Meeting: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर हे कार्यपद्धतीवर नाराज असून ते लवकरच दुसरा गट स्थापन करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगल्या आहेत. अशामध्येच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (Swabhimani Shetkari Sagnhtana) शिस्तपालन आणि कोअर कमिटीची आज पुण्यामध्ये बैठक झाली. या बैठकीमध्ये रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांच्याबाबत चर्चा झाली. या बैठकीला राजू शेट्टींसह सर्व नेते उपस्थित होते. मात्र रविकांत तुपकर यांनी उपस्थिती लावली नाही.
अशामध्ये या बैठकीनंतर राजू शेट्टी (Raju Shetty) आणि जालिंदर पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी रविकांत तुपकर यांना १५ ऑगस्टपर्यंत म्हणणे मांडण्याची मुदत देण्यात आली आहे. तुपकरांनी भूमिका मांडली नाही तर समिती निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रविकांत तुपकर प्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून शिस्तभंग समिती नेमली होती. समितीने यावर आज राजू शेट्टी आणि इतर पदाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण घेतेल. पण तुपकर या बैठकीला आले नाहीत. या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना राजू शेट्टी यांनी सांगितले की, 'रविकांत तुपकर यांची भूमिका संघटनेसाठी हानिकारक होती. त्यांनी या बैठकीला येणे अपेक्षित होते. शिस्तपालन समिती समोर मी तुपकर यांच्या आरोपाचा खुलासा केला. आता समितीकडे निर्णय सोपवला आहे. निर्णय प्रक्रियेत मी सहभागी होणार नाही.'
राजू शेट्टी यांनी पुढे सांगितले की, '5 जणांची एक समिती नेमली आहे. समितीने निर्णय घ्यावा तो सर्वांना बंधनकारक असेल. काम थांबवता येत नाही त्यामुळे साखर आयुक्तांकडे मी जाणार आहे. थकीत एफआरपीचा मुद्दा मांडणार आहे. सगळ्याच पक्षात होतं आहे. पवारांपेक्षा आमचं बरं आहे.' तर स्वाभिमानीचे जालिंदर पाटील यांनी सांगितले की, 'तुपकर वैयक्तिक आरोप करत असतील असं वाटतं नाही. त्यामागे व्यापक काही असावे असे वाटते आहे. तुपकर येणार होते. म्हणून संघटनेची आज बैठक बोलावली. तरी ते आले नाहीत.'
जालिंदर पाटील यांनी पुढे सांगितले की, 'तुपकर यांचा वाद बुलडाण्यातला आहे. स्थानिक वाद नेतृत्वावर लादले जात आहेत. राजू शेट्टींनी मी कसा दोषी नाही हे स्पष्ट केलं आहे. तुपकर आले असते तर भांडण मिटवता आले असते.'
तसंच, 'तुपकरांना १५ ऑगस्टपर्यंत म्हणणे मांडण्याची मुदत दिली आहे. समितीसमोर त्यांना म्हणणे मांडण्याची मुदत देण्यात आली आहे. तुपकरांनी चळवळीसोबत राहावे. आईच्या ममतेने राजू शेट्टी आरोप, चुका पोटात घालायला तयार आहेत. राजू शेट्टींवर आरोप केल्याशिवाय राज्यात मोठं होता येत नाही. तुपकरांनी समितीसमोर भूमिका मांडावी. भूमिका मांडली गेली नाही तर समिती निर्णय घेईल.', असं जालिंदर पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.