Avishwas Prastav 2023: काँग्रेस खासदाराचे PM मोदींना 3 महत्वाचे प्रश्न अन् सत्ताधाऱ्यांमध्ये सन्नाटा; लोकसभेत नेमकं काय घडलं?

Avishwas Prastav 2023 BJP vs Congress: मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरून विरोधकांनी मोदी सरकारविरोधात संसदेत अविश्वात प्रस्ताव आणला आहे. या प्रस्तावावर आज दुपारी १२ वाजेपासून चर्चा सुरू झाली आहे
Avishwas Prastav 2023 Congress MP Asked 3 questions to Chief Minister PM Modi Manipupur clashes Here what happen in Loksabaha
Avishwas Prastav 2023 Congress MP Asked 3 questions to Chief Minister PM Modi Manipupur clashes Here what happen in Loksabaha Saam TV
Published On

Avishwas Prastav 2023 BJP vs Congress: मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरून विरोधकांनी मोदी सरकारविरोधात संसदेत अविश्वात प्रस्ताव आणला आहे. या प्रस्तावावर आज दुपारी १२ वाजेपासून चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची लोकसभेत पुन्हा एन्ट्री झाल्याने विरोधकांचा आत्मविश्वास वाढला आहे.

दरम्यान, लोकसभेतील अविश्वास प्रस्तावावर राहुल गांधी नव्हे तर गौरव गोगोई काँग्रेसकडून चर्चेला सुरुवात केली. यावेळी गोगोई यांनी सुरूवातीलाच मोदी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मणिपूर हिंसाचारावरून 3 महत्वाचे प्रश्न देखील विचारले.

Avishwas Prastav 2023 Congress MP Asked 3 questions to Chief Minister PM Modi Manipupur clashes Here what happen in Loksabaha
No Confidence Motion 2023 : लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर आज चर्चा, कोणत्या पक्षाला किती वेळ मिळणार?; वाचा सविस्तर

गोगोई यांनी सुरूवातीलाच सरकारवर प्रश्नांची तोफ डागताच लोकसभेत गोंधळ झाला. विरोधकांनी त्यांच्या प्रश्नाला समर्थन देत घोषणाबाजी सुरू केली. दुसरीकडे गौरव गोगोई यांचे प्रश्न ऐकून सत्ताधाऱ्यांनी शांततेचा पवित्रा घेतला.

लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू करताना गौरव गोगोई म्हणाले, "सरकारने आम्हाला अविश्वास प्रस्ताव आणण्यास भाग पाडले आहे. हा प्रस्ताव लोकसभेतील सदस्यांच्या संख्याबद्दल नाही, तर मणिपूरच्या न्यायासाठी आहे. मी हा प्रस्ताव मांडतो की या सभागृहाने सरकारवर अविश्वास व्यक्त केला आहे. I.N.D.I.A. ने मणिपूरसाठी हा प्रस्ताव आणला आहे. मणिपूरला न्याय हवा आहे. "

पुढे बोलताना गौरव गोगोई म्हणाले, "हा फक्त मणिपूरचा नाही तर संपूर्ण भारताचा विषय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरून सभागृहात बोलावं एवढीच आमची अपेक्षा होती. पण त्यांनी मौनव्रत धारण केलं. हेच मौनव्रत तोडण्यासाठी हा प्रस्ताव आणावा लागला. तुमचे आभार की आपण आमचा INDIA आघाडीचा प्रस्ताव स्वीकारला", असं म्हणत गोगोई यांनी अध्यक्षांचे आभार मानले.

खासदार गौरव गोगोई यांनी विचारलेले तीन प्रश्न

दरम्यान, काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 महत्वाचे प्रश्न विचारले.

प्रश्न 1 - पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरला का गेले नाहीत?

प्रश्न 2 - मोदी मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरून का बोलत नाहीत? बोलले तर 37 सेकंद का ? बाकी मंत्री बोलतात, पण मोदी का बोलत नाहीत?

प्रश्न 3 - पंतप्रधान मोदींनी मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना का काढून टाकल नाही ? बाकी राज्यात आपण मुख्यमंत्री बदलले मग मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना का बदललं नाही?

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com