No Confidence Motion 2023 : लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर आज चर्चा, कोणत्या पक्षाला किती वेळ मिळणार?; वाचा सविस्तर

Parliment Monsoon Session News: विरोधकांनी आणलेल्या अविश्वास ठरावावर लोकसभेत चर्चा सुरु असून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत.
Rahul Gandhi In Loksabha
Rahul Gandhi In Loksabha Saam Tv

Loksabha News: संसदेच्या पावसाळी अधिवेशनचा (Monsoon Session of Parliament) हा शेवटचा आठवडा आहे. मणिपूर हिंसाचारासह (Manipur Clashes) विविध विषयांवर विरोधक आक्रमक आहेत. अशामध्ये आज विरोधकांनी आणलेल्या अविश्वास ठरावावर लोकसभेत चर्चा सुरु आहे. खासदारकी बहाल केल्यानंतर आज लोकसभेमध्ये विरोधी पक्षाकडून राहुल गांधी (Rahul Gandhi) हे पहिले वक्ते असू शकतात. राहुल गांधी नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर निशिकांत दुबे भाजपच्या बाजूने चर्चा सुरू करू शकतात.

Rahul Gandhi In Loksabha
Avishwas Prastav 2023: काँग्रेस खासदाराचे PM मोदींना 3 महत्वाचे प्रश्न अन् सत्ताधाऱ्यांमध्ये सन्नाटा; लोकसभेत नेमकं काय घडलं?

पंतप्रधान नरेंद्र मोदी १० ऑगस्टला संध्याकाळी या चर्चेला उत्तर देतील आणि त्यानंतर विरोधकांनी मतदानाची मागणी केल्यास प्रस्तावावर मतदान केले जाईल. अविश्वास ठरावावरील चर्चेसाठी एकूण १२ तासांचा अवधी निश्चित करण्यात आला आहे. खासदारांच्या संख्येच्या आधारावर सर्व राजकीय पक्षांना सभागृहात बोलण्याची वेळ देण्यात आली आहे. पण गरज भासल्यास सभापती किंवा अध्यक्ष ही मुदत वाढवू शकतात. कोणत्या पक्षा अवश्वास ठरावाच्या चर्चेवर बोलण्यासाठी किती वेळ देण्यात आला आहे हे आपण पाहणार आहोत.

Rahul Gandhi In Loksabha
BEST Worker Protest Update: अखेर बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप मागे, मागण्या मान्य होताच केला जल्लोष

अविश्वास ठरावावरील चर्चेसाठी कोणत्या पक्षाला किती वेळ? -

- भाजप - लोकसभेत भाजपचे सर्वाधिक ३०१ खासदार आहेत. त्यामुळे भाजपला भाषण करण्यासाठी जास्तीत जास्त ६ तास ४१ मिनिटांचा वेळ देण्यात आला आहे.

- काँग्रेस - लोकसभेत काँग्रेसचे ५१ खासदार आहेत. त्यामुळे काँग्रेसला १ तास ९ मिनिटांचा वेळ देण्यात आला आहे.

- द्रमुक - द्रमुकचे २४ खासदार आहेत. त्यामुळे त्यांना ३० मिनिटांचा वेळ देण्यात आला आहे.

Rahul Gandhi In Loksabha
Ameya Khopkar On Aditya Thackeray: 'बोलण्यापेक्षा आमच्यासारखं करुन दाखवण्याची हिंमत ठेवा', टोलनाक्याच्या मुद्द्यावरुन मनसेचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

- टीएमसी - लोकसभेत टीएमसीचे २३ खासदार आहेत. त्याुळे त्यांना २९ मिनिटांचा वेळ देण्यात आला आहे.

- वायएसआर काँग्रेस - वायएसआर काँग्रेसचे संसदेत २२ खासदार आहेत. त्यामुळे त्यांना २९ मिनिटांचा वेळ देण्यात आला आहे.

- शिवसेना - लोकसभेमध्ये शिवसेनेचे २३ खासदार आहेत. त्यामुळे त्यांना 23 मिनिटांचा वेळ देण्यात आला आहे.

Rahul Gandhi In Loksabha
Ravikant Tupkar Big Statement: 'मी कुठल्याही पक्षात जाणार नाही, शेतकरी चळवळीचं काम करणार', रविकांत तुपकरांनी चर्चांना दिलं पूर्णविराम

- जेडीयूला २१ मिनिटं, बीजेडीला १६ मिनिटं, बसपाला १२ मिनिटं, एलजेएसपीला ८ मिनिटं देण्यात आली आहेत.

- AIADMK, अपना दल, AJSU, MNF, SKM, NDPP, NPP, APF आणि अपक्षांना १७ मिनिटं देण्यात आली आहेत.

- राष्ट्रवादी काँग्रेस, सपा, सीपीएम, सीपीआय, आययूएमएल, नॅशनल कॉन्फरन्स, जेडीएस, जेएमएम, अकाली दल आणि आपसह उर्वरित सर्व पक्षांना एकूण ५२ मिनिटांची वेळ देण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com