MNS News: टोलनाक्याच्या (Toll Plaza) मुद्द्यावरुन सरकारला (Maharashtra Government) धारेवर धरणाऱ्या आणि आमचे सरकार आल्यावर टोलनाके बंद करुन असे आश्वासन देणाऱ्या ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे (MLA Aditya Thackeray) यांच्यावर मनसेने आपल्या स्टाईलने टीका केली आहे. मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (Amey Khopkar) यांनी ट्वीट करत आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. 'बोलण्यापेक्षा आमच्यासारखं करुन दाखवण्याची हिंमत ठेवा', असे त्यांनी म्हटले आहे.
अमेय खोपकर यांनी ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, 'राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात आंदोलन झाल्यानंतर ६५ टोलनाके बंद झाले. आम्ही बोलत नाही करुन दाखवतो. उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री असताना टोलनाके बंद करायचं का नाही सुचलं? धमक नाही तर फुकटची आश्वासनं द्यायची कशाला? असल्या टोलवाटोलवीला लोकं कंटाळली आता, तेव्हा नुसतं बोलू नका, आमच्यासारखी करुन दाखवायची हिंमत ठेवा' अमेय खोपकर यांनी या ट्विटमध्ये #penguinsena असा हॅशटॅग देखील वापरला आहे.
आदित्य ठाकरे यांनी सोमवारी मुंबईमध्ये मातोश्री या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुंबईतील वेगवेगळ्या मुद्द्यावरुन सरकारवर टीका केली. सरकारकडून मुंबईकरांची लूट सुरु आहे असं म्हणत त्यांनी हिंमत असेल तर टोलनाके बंद करा असे आव्हान सरकारला दिलं होतं. तसंच, मुंबईकरांवर डबल जबाबदारी का? त्यांच्याकडून दुप्पट कर का आकारला जात आहे?, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला होता. आता याच मुद्द्यावरुन मनसेने त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत लढत राहणार असा आक्रमक पवित्रा आदित्य ठाकरे यांनी घेतला आहे. आदित्य ठाकरे यांनी सांगितले होते की, 'मुंबईचे इस्टर्न एक्स्प्रेस हायवे आणि वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे हे दोन्ही एमएमआरडीएने बीएमसीकडे हस्तांतरीत करुन दिले आहेत. मुंबई महापालिकेच्या खर्चातून या दोन्ही हायवेच्या मेनटनन्सचा खर्च केला जातो. हे जर होत असेल जर मुंबईकरांच्या करातून त्यांच्या पैशातून जर या दोन प्रमुख रस्त्यांचे मेनटेनन्स होत असेल तर अजूनही तिथे टोलनाका, होर्डिंगचा सर्व पैसा महापालिकेकडे जात नाही. हा पैसा एमएसआरडीसीकडे (MSRDC) का जात आहे?', असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.