Supreme Court Rejects Indurikar Maharaj Application: सर्वोच्च न्यायालयाने इंदुरीकर महाराजांची याचिका फेटाळली : 'अंनिस' ची माहिती

याचिकाकर्त्या तथा अंनिसच्या राज्य सचिव ऍड. रंजना गवांदे यांनी दिली साम टीव्हीला माहिती.
indurikar maharaj, Supreme Court
indurikar maharaj, Supreme Courtsaam tv
Published On

- सचिन बनसाेडे

Nagar News : गर्भलिंग निदान चाचणी प्रतिबंधक कायदा (PCPNDT) यानुसार दाखल झालेला गुन्हा रद्द करावा अशी मागणी करणारी प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांची याचिका सर्वाेच्च न्यायालयाने (supreme court) फेटाळली आहे. ही याचिका फेटाळल्याने त्यांच्यावर कायदेशिर कारवाई हाेण्याचा मार्ग माेकळा झाल्याची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सचिव ऍड. रंजना गवांदे यांनी सांम टीव्हीशी बाेलताना दिली. (Maharashtra News)

indurikar maharaj, Supreme Court
Ravikant Tupkar vs Raju Shetti : अखेर राजू शेट्टींनी रविकांत तुपकरांना सुनावलं

इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांनी एका कीर्तनातून पुत्ररत्न प्राप्तीच्या संदर्भाने जाहीरपणे विधान केले होते. त्याविरोधात संगमनेर (Sangamner) येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या रंजना गवांदे यांनी नगर जिल्हा शल्यचिकित्सकांकडे तक्रार केली होती.

तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्त्री भ्रूणहत्या प्रतिबंधक कायद्यान्वये म्हणजे पीसीपीएनडीटी ऍक्टनुसार संगमनेरच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व निदानंतंत्र लिंग निवडीस प्रतिबंध कायद्याच्या कलम 28 नुसार तक्रार केली.

indurikar maharaj, Supreme Court
World Archery Championships 2023: साता-याच्या आदिती स्वामीने रचला इतिहास, जागतिक तिरंदाजीत 'सुवर्ण'; ठरली पहिली भारतीय महिला खेळाडू (पाहा व्हिडिओ)

इंदुरीकर महाराज यांनी विविध न्यायालयात दाखल असलेला गुन्हा रद्द करावा यासाठी प्रयत्न केले. त्यात त्यांना यश आलं नाही. दरम्यान याबाबत सर्वोच्च न्यायालयाने देखील गुन्हा रद्द करण्याची याचिका फेटाळल्याने त्यांच्या विराेधात आता संगमनेर जिल्हा व सत्र न्यायालयात खटला चालणार आहे असे वकील रंजना गवांदे यांनी स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com