Uber Cab Driver Chat Viral Saam tv
देश विदेश

Uber: मला तू खूप आवडतेस, मुलीला कॉलेजला सोडल्यानंतर उबर चालकाचे मेसेज, चॅट व्हायरल

Uber Cab Driver Chat Viral: उबरने रोज हजारो लोक प्रवास करतात. दरम्यान एका उबर चालकाने एका मुलीला ड्रॉप केल्यानंतर तिला पर्सनल नंबरवर मेसेज केला आहे.

Siddhi Hande

आजकाल अनेकजण कॅबचा वापर करतात. ऑफिसला जाण्यासाठी- येण्यासाठी ओला, उबर आणि रॅपिडोचा वापर करतात. दरम्यान, आता उबरने प्रवास करणाऱ्या प्रवाशाला एक वेगळाच अनुभव आला आहे. एका कॅब ड्रायव्हरने महिला प्रवाशाला थेट पर्सनल नंबरवर मेसेज केला आहे. याचा स्क्रिनशॉट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

एका कॅब ड्रायव्हरने तरुणीला आधी कॉलेजला सोडलं. त्यानंतर तिच्या परवानगीशिवाय पर्सनल नंबरवर मेसेज केला आहे. तो त्या मुलीसोबत चॅट करु लागला. कॅब ड्रायव्हर म्हणाला की, मला तू खूप आवडली म्हणून मेसेज केला. या मेसेजचा स्क्रिनशॉट सध्या व्हायरल होत आहे.

चॅटमध्ये काय म्हटलंय? (Uber Cab Driver Chat Viral)

उबर चालकाने एका मुलीला कॉलेजला ड्रॉप केलं. त्यानंतर त्याने तिच्या पर्सनल नंबरवर मेसेज केला आणि म्हणाला की,हाय, मी आज सकाळी तुम्हाला कॉलेजला सोडले. मला तुम्ही खूप आवडलात. मी कॅब ड्रायव्हर नाही तर टूर अँड ट्रॅव्हल्स कंपनीचा मालक आहे. मुलीला इम्प्रेस करण्याच्या नादात त्याने मुलीला तो या कंपनीचा मालक असल्याचे सांगितले. दरम्यान, कॅब चालकाने हा मेसेज केल्यानंतर मुलीने कॅब ड्रायव्हरला थेट ब्लॉकच केलं.

सध्या कॅब ड्रायव्हरचा या मेसेजचा स्क्रिनशॉट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या मेसेजवर लोकांनी सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहे. कोणी कॅब ड्रायव्हर असा कसा मेसेज करु शकतो, असं म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: प्रियांश-कॉनॉलीच्या वादळी खेळीपुढे लखनौचा संघ ढेर, पंजाब किंग्सच्या विजयाचा पंजा

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

SCROLL FOR NEXT