Cab Fare Hike: ओला, उबर, रॅपिडोच्या भाड्यात दुप्पट वाढ, केंद्र सरकारने दिली परवानगी

OLA, Uber And Rapido Fare Hike: कॅब सर्व्हिस देणाऱ्या कंपन्या आता गर्दीच्या वेळी दुप्पट भाडे आकारु शकणार आहेत. यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे.
Cab Fare Hike
Cab Fare HikeSaam Tv
Published On

सध्या अनेकजण कुठेही जायचे असेल तर कॅबचा वापर करतात. ऑनलाइन अॅपवरुन कॅब बुक केली तर पुढच्या ५-१० मिनिटांत आपल्याला पिक करायला कॅब घराजवळ येते. अनेकजण रोज ऑफिसलादेखील कॅबनेच जातात. आरामदायी प्रवासासाठी कॅब हे उत्तम साधन आहे. परंतु आता कॅबने प्रवास करणाऱ्यांना फटका बसणार आहे. आता ओला, उबर आणि रॅपिडो (OLA, UBER, Rapido Fare Hike) यांसारख्या कंपन्यांना पिक ऑवर्स म्हणजेच गर्दीच्या वेळी दुप्पट भाडे आकारता येणार आहे.

Cab Fare Hike
Mumbai Rain : मुंबईच्या मध्यवर्ती भागात पावसाला सुरुवात; यलो अलर्ट जारी | VIDEO

आता कॅब सर्व्हिस (Cab Service) कंपनी गर्दीच्या वेळी डबल पैसे आकारु शकते. यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. कॅब सर्व्हिसमधील मोटारसायकल वापरणाऱ्यांनादेखील ही सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे आता गर्दीच्या वेळी ते दुप्पट भाडं आकारु शकणार आहेत. साधारणपणे ऑफिस टाइममध्ये खूप जास्त गर्दी असते. त्यावेळी हे दुप्पट भाडं आकारलं जाणार आहे.

परिवहन मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. राज्य सरकारने संबंधित वाहनासाठी किंवा त्या श्रेणीतील वाहनांसाठी भाडे नेमून दिले आहे.गर्दीच्या वेळी पुरवठादार कंपन्या मूळ भाड्यापेक्षा दुप्पट भाडे आकारले जाण्याची परवानगी दिली आहे, असं मंत्रालयाने म्हटले आहे.

Cab Fare Hike
Pune Crime : दौंडमध्ये भयंकर घडलं! देवदर्शनासाठी जाताना मुलीवर अत्याचार; आरोपींच्या शोधासाठी पाच पथकं तैनात

टॅक्सी सेवा (Taxi Service) देणाऱ्या कंपन्याना ५० टक्के कमी आणि उप-कलम (१७.१) अंतर्गत मूळ भाड्याच्या दुप्पट किंमत आकारण्याची परवानगी मिळेल. डेड मायलेज भरुन काढण्यासाठी ३ किलोमीटरचे मूळ भाडे आकारले जाईल. यामध्ये प्रवाशाशिवाय प्रवास केलेले अंतर आणि प्रवाशांना ते असलेल्या ठिकाणाहून पिक करण्यापर्यंतच्या इंधनाचा समावेश असेल. यासाठी मार्गदर्शक सूचना राज्यांनी तीन महिन्यात स्वीकाराव्यात, असं सरकारने म्हटलं आहे.

Cab Fare Hike
Pune Fire : फटाक्यांची आतषबाजी, लक्ष्मीपूजनाला पुण्यात ३१ ठिकाणी आगडोंब

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com