Pune Crime : दौंडमध्ये भयंकर घडलं! देवदर्शनासाठी जाताना मुलीवर अत्याचार; आरोपींच्या शोधासाठी पाच पथकं तैनात

Pune News : पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यात स्वामी चिंचोली गावाच्या हद्दीत दोघांनी गळ्याला कोयता लावून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले. या प्रकरणी आरोपींचा शोध घेण्यासाठी पाच टीम तैनात करण्यात आल्या आहेत.
Pune Crime
Pune Crimex
Published On

सागर आव्हाड, साम टीव्ही, प्रतिनिधी

पुणे : काल पहाटे चार वाजल्याच्या सुमारास तीन ते चार कुटुंबातील सात जण हे देव दर्शनासाठी जात असताना पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावाच्या हद्दीत चहा पिण्यासाठी थांबलेल्या या भाविकांना दोन जणांनी लुटून गळ्याला कोयता लावून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

या प्रकरणी दौंड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला असून आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. याबाबत ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी माहिती दिली. ते म्हणाले, 'काल पहाटे चार वाजल्याच्या सुमारास एकाच गावातील तीन ते चार कुटुंबातील सात जण हे देव दर्शनासाठी जात होते. ज्यात एक ज्येष्ठ नागरिक जे गाडी चालवत होते. त्यांच्यासोबत दोन सतरा वर्षाची मुलं, एक सतरा वर्षाची मुलगी,आणि तीन महिला होत्या.'

Pune Crime
Pune : पुणे हादरलं! स्मशानभूमीत अघोरी प्रकार, अंत्यविधीच्या ठिकाणी हळद-कुंकू, टाचण्या, लिंबू, नारळ आढळल्याने खळबळ

'हे सर्व देवदर्शनासाठी जात असताना दौंड पोलीस स्टेशनच्या हद्दीत भिगवण गावच्या एक ते दीड किलोमिटर अलीकडे हे सर्वजण गाडीतून जात असताना ड्रायव्हर हा चहा पिण्यासाठी थांबला असता एक टपरी जवळ ते थांबले आणि चहा पिल्यावर ड्रायव्हर हे परत आल्यावर दोन जण हे त्यांच्या गाडीजवळ आले आणि धारदार शस्त्राचे धाक दाखवून तसेच मिरची पावडरच वापर करून महिलांचे दागिने काढले आणि परत जाताना गाडीत बसलेल्या अल्पवयीन मुलीला गाडीतून बाहेर काढलं आणि पुढे नेऊन अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आहे आणि दोन्ही आरोपी हे फरार झाले', अशी माहिती संदीप सिंह गिल्ल यांनी दिली.

Pune Crime
Pune Accident : पुण्यात भीषण अपघात! कॅम्प परिसरात बांधकामस्थळी स्लॅब कोसळला, तरुणाचा जागीच मृत्यू

या प्रकरणी दौंड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे वरिष्ठ पोलिसांनी घटना स्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पाच टीम तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला. लवकरच संंबंधित आरोपींना शोधून अटक केली जाईल, असा विश्वास संदीप सिंह गिल्ल यांनी व्यक्त केला आहे.

Pune Crime
Pune Crime : पुण्यात भयंकर घडलं! दिवसाढवळ्या सोन्याच्या दुकानावर दरोडा, कोयत्याने सपासप वार केले अन्...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com