Pune : पुणे हादरलं! स्मशानभूमीत अघोरी प्रकार, अंत्यविधीच्या ठिकाणी हळद-कुंकू, टाचण्या, लिंबू, नारळ आढळल्याने खळबळ

Manchar Smashan Bhoomi: पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे स्मशानभूमीत जादूटोण्याचा अघोरी प्रकार सुरु असल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे मंचर आणि आसपासच्या परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
Smashan Bhoomi
Smashan Bhoomisaam tv
Published On

रोहिदास गाडगे, साम टीव्ही, प्रतिनिधी

पुण्यातून धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील स्मशानभूमीमध्ये अघोरी प्रकार सुरु असल्याचे समोर आले आहे. अंत्यविधी झालेल्या ठिकाणी चाकू, लिंबू, नारळ, कोहळे, हळद-कुंकू, टाचण्या, दाभण, गौऱ्या अशा विविध वस्तू अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अंधश्रद्धेच्या विरोधात जनजागृती आणि कठोर कारवाईची मागणी होत आहे.

आंबेगाव तालुक्यातील मंचर, शेवाळवाडी आणि निघोटवाडी या तीन ग्रामपंचायतींच्या संयुक्त स्मशानभूमीत अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा जादूटोण्याचा अघोरी प्रकार समोर आला आहे. २७ जून रोजी नानाभाऊ थोरात यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्यावर मंचर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सोमवारी (३० जून) सकाळी थोरात कुटुंबीय राख सावडण्यासाठी स्मशानभूमीत आले असताना त्यांना राखेमध्ये जळालेल्या अवस्थेत लिंबू, नारळ, कोहळे, हळद-कुंकू, टाचण्या, दाभण अशा संशयास्पद वस्तू आढळून आल्या.

Smashan Bhoomi
Pune Crime : पुण्यात भयंकर घडलं! दिवसाढवळ्या सोन्याच्या दुकानावर दरोडा, कोयत्याने सपासप वार केले अन्...

रविवारी (२९ जून) रोजी रात्री बाराच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्ती दुचाकीवरुन स्मशानभूमीत आल्या. त्यांनी स्मशानभूमीतील गौऱ्या पेटवून त्यात अनेक गोष्टी टाकल्या. काही आवाज केल्यानंतर ते दोघे थोड्या वेळानंतर तेथून निघून गेले, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

Smashan Bhoomi
Sangitatai Pawar : दगडाने ठेचून खून, त्याचवेळी मंदिरात चोरी; महिला कीर्तनकार हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर

'स्मशानभूमीमध्ये संरक्षक भिंत, जाळी किंवा अन्य कोणताही सुरक्षा व्यवस्था नाही. त्यामुळे कुणीही आत-बाहेर जाऊ शकतात. अशा घटना टाळण्याच्या उद्देशाने तेथे तातडीने संरक्षक भिंत, लोखंडाची जाळी, सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत', असे भाजप किसान मोर्चाचे माजी जिल्ह्याध्यक्ष संजय थोरात यांनी म्हटले आहे.

Smashan Bhoomi
Ind Vs Eng : लीड्सपाठोपाठ टीम इंडिया बर्मिंगहॅममध्ये हरणार? इंग्लंडचा संघ पुन्हा वरचढ ठरणार? कारण...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com