Homemade sev: शेवपुरीचे कुरकुरीत शेव घरच्या घरी कसे बनवावे?

Surabhi Jayashree Jagdish

शेव

शेवपुरीमध्ये वापरले जाणारे शेव घरच्या घरी अगदी कमी साहित्यामध्ये तयार करता येते. बेसन, तांदळाचे पीठ आणि काही मसाल्यांच्या मदतीने हे कुरकुरीत शेव बनवले जाते. योग्य पद्धतीने पीठ मळून गरम तेलात शेव तळल्यास त्याला बाजारासारखी चव आणि कुरकुरीतपणा येतो. हे शेव चाट, भेळ आणि विविध स्नॅक्समध्ये वापरले जाते.

Crispy sev recipe

शेव बनवण्यासाठी लागणारे साहित्य

शेव तयार करण्यासाठी बेसन, तांदळाचं पीठ, लाल तिखट, हळद, हिंग, मीठ आणि तेल लागते. या सर्व साहित्यामुळे शेवला चांगली चव आणि कुरकुरीत टेक्स्चर मिळते.

Besan sev recipe

कोरडं साहित्य एकत्र करा

एका मोठ्या भांड्यात बेसन आणि तांदळाचे पीठ घ्या. त्यामध्ये लाल तिखट, मीठ, हळद आणि हिंग मिसळा. हे सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र केल्याने शेवची चव सर्वत्र सारखी लागते.

Indian snack recipe

पीठ मळा

मिश्रणात गरम तेल टाका आणि हलक्या हाताने मिसळा. त्यानंतर थोडंथोडं पाणी घालून मऊसर पीठ मळा. पीठ खूप कडक किंवा खूप पातळ नसावे, कारण त्यामुळे शेव नीट तयार होत नाही.

Easy sev making

शेव मेकर

शेव बनवण्यासाठी शेव मेकरला थोडं तेल लावा. त्यामध्ये बारीक छिद्रांची प्लेट बसवा जेणेकरून पातळ शेव तयार होईल. तयार केलेलं पीठ शेव मेकरमध्ये भरल्यावर ते सहज प्रेस येतं.

Tea time snacks

गरम तेलात शेव सोडणं

कढईमध्ये तेल चांगलं गरम करा आणि शेव मेकरमधून बारीक शेव थेट तेलात सोडा. शेव गोलाकार पद्धतीने सोडल्यास ते एकसारखे तळले जाते. मध्यम आचेवर तळल्यामुळे शेव कुरकुरीत बनते आणि पटकन जळत नाही.

Homemade namkeen

शेव कुरकुरीत तळा

शेव हलक्या सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळा. तळलेले शेव टिश्यू पेपरवर काढल्याने अतिरिक्त तेल निघून जाते. पूर्ण थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यात ठेवल्यास शेव अनेक दिवस कुरकुरीत राहतात

Deep fried snacks

Satara Tourism: गारेगार वातावरणात पिकनीकला जाताय? साताऱ्यातील ही ठिकाणं ठरतील बेस्ट ऑप्शन

येथे क्लिक करा