Sakshi Sunil Jadhav
सकाळी पोट साफ झालं नाही तर दिवसभर चिडचिड, अस्वस्थता आणि थकवा जाणवतो. अनेकदा लोक बद्धकोष्ठतेकडे दुर्लक्ष करतात. मात्र ही समस्या जास्त दिवस राहत असेल तर पचनसंस्था बिघडून गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो.
जास्त मीठ, मिरची आणि तिखट पदार्थ खाल्ल्यावर पोटातली उष्णता वाढते. त्यामुळे पचनक्रिया बिघडते आणि पोट साफ न होण्याची समस्या निर्माण होऊ शकते.
पुरेशी झोप घेतली नाहीतर शरीराची पचनशक्ती कमकुवत होते. याचा परिणाम Gut Health वर होतो. आतड्यांमध्ये घाण साचून राहते आणि पोट साफ होत नाही.
ऑफिसमध्ये तासन्तास बसून काम करणाऱ्या लोकांमध्ये पोट साफ न होण्याचा त्रास जास्त असतो. शारीरिक हालचाल कमी झाल्याने गॅस, ब्लोटिंग आणि पोट साफ न होण्याच्या समस्या वाढतात.
अधिक तणाव घेतल्याने हार्मोन्सचे संतुलन बिघडते. याचा परिणाम थेट पचनसंस्थेवर होतो. मानसिक तणावामुळे बद्धकोष्ठतेची समस्या गंभीर होऊ शकते.
शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी पुरेसे पाणी आवश्यक असते. कमी पाणी प्यायल्यास मल कडक होतो आणि शौचास त्रास होतो. डिहायड्रेशनमुळे बद्धकोष्ठतेचा धोका वाढतो.
पचनक्रिया सुधारण्यासाठी दररोज योगासनं, चालणं आणि हलका व्यायाम करणं फायदेशीर ठरेल.
फळं, भाज्या, सलाड आणि संपूर्ण धान्यांचा आहारात समावेश केल्याने पोट साफ होतं.
ध्यान, योग आणि पुरेशी झोप यामुळे मानसिक तणाव कमी होतो आणि पचनसंस्था चांगली राहते.