दोन रशियन महिलांचा गोव्यात मृत्यू Saam Tv
देश विदेश

दोन रशियन महिलांचा गोव्यात मृत्यू

त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

वृत्तसंस्था

पणजी - उत्तर गोवाच्या goa सिओलिम गावात दोन रशियन महिलांचा दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासात या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. यामध्ये महिला ज्या भाड्याच्या घरांमध्ये राहत होत्या तिथे मृतावस्थेतआढळून आल्या आहेत त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हे देखील पहा -

प्राप्त महतीनुसार, २४ वर्षीय अॅलेक्झांड्रा जावी ही गुरुवारी राहत्या घरात पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. तर ३४ वर्षांय एकाटेरिना टिटोवा सुद्धा आपल्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळून आली.

दरम्यान, या घटनेबाबद गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टिटोवाच्या मृतदेहावर कोणत्याही प्रकारचे जखम नव्हते. दोन्ही प्रकरणात अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या संपूर्ण घटनेचा अधिक तपास गोवा पोलिसांकडून करण्यात येत आहे.

गोव्यात रशियन पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सिओलिममधील मोरजिम आणि अरमाबोल ही गावे समुद्र किनाऱ्याजवळ असून रशियन पर्यटकांमध्ये ही जागा खूप लोकप्रिय आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बारामतीत बड्या उद्योजकावर भीषण हल्ला! शहरात खळबळ

Maharashtra News Live Update: मुंबईत गॅंगवॉर खपवूनन घेतला जाणार नाही- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

त्याने आमचं ऐकलं नाही; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर 'अनिल' नावाची पोस्ट व्हायरल

Tiger Shroff Firing Video: दोन सेकंदात ५ राउंड; अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा व्हिडिओ आला समोर

टायगर श्रॉफवर ५ राऊंड फायर, गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; बॉलीवूड हादरलं | VIDEO

SCROLL FOR NEXT