माओवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात 2 जवान शहीद
माओवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात 2 जवान शहीदSaam Tv

माओवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात 2 जवान शहीद

सुधाकर शिंदे देशाची सेवा करताना शहीद
Published on

नांदेड - छत्तीसगडमधील नारायणपूर Narayanpur जिल्ह्यात माओवाद्यांनी जवानांवर भ्याड हल्ला केला आहे. इंडो तिबेटीयन बटालियनच्या जवानावर माओवाद्यांनी गोळीबार केला असून या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले आहे. यामध्ये नांदेड Nanded जिल्ह्यतील जवान सुधाकर शिंदे Sudhakar Shinde यांचा समावेश आहे. मुखेड तालुक्यातील बामणी येथील जवान सुधाकर शिंदे हे काल दुपारी शहीद झालेत आहे. सुधाकर शिंदे हे इंडो तिबेटीयन बटालियनमध्ये असिस्टंट कमांडंट म्हणून कार्यरत होते. सुधाकर शिंदे देशाची सेवा करताना शहीद झाल्याचे कळताच बामणी गावावर शोककळा पसरली.

हे देखील पहा -

शिंदे यांच शालेय शिक्षण मुक्रामाबाद येथील डॉ. भाऊसाहेब देशमुख विद्यालयात घेतले त्यानंतर परभणी कृषी विद्यापीठातून सन २००० मध्ये कृषी विषयाची पदवी घेतली. २०२१ मध्ये आयटीबीटी विभागात सब इन्स्पेक्टर म्हणून रुजू झाले. त्यानंतर २०१९ मध्ये छत्तीसगड राज्यात नक्षली प्रतिबंधक पथकात नियुक्ती झाली.

माओवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात 2 जवान शहीद
कोरोना काळात मराठी कलाकार, लोक कलावंत, नाट्यकर्मी यांचे मोठे नुकसान - मातोंडकर

कार्यकिर्दीत शिंदे यांनी हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, हरयाणा, पंजाब सिमेवर सेवा बजावली आहे शिंदे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे.शहीद सुधाकर शिंदे यांच्या पार्थिवावर आज मुळगावी बामणी इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे या हल्ल्यात गुरमुख सिंह शहीद झाले आहे. जवानांनी घटनास्थळाचा ताबा घेतला असून सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहेत.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com