Tur Dal Price Update saam tv
देश विदेश

Tur Dal Price: तूर डाळीच्या वाढत्या दरांना लागणार ब्रेक, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Tur Dal Price Update: केंद्र सरकार आता गव्हाप्रमाणे बफर स्टॉकमधून डाळी देखील विकणार असल्याचे बोलले जात आहे.

Chandrakant Jagtap

Pulses Price Hike: ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत तूर डाळीची उपलब्धता वाढवी, या उद्देशाने आयात केलेला साठा देशांतर्गत बाजारात येईपर्यंत तूर डाळ देशाच्या बफर स्टॉकमधून सोडण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने या संदर्भात एक घोषणा केली आहे. तसेच राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (NAFED) आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (NCCF) यांना ऑनलाइन लिलावाद्वारे तूर विल्हेवाट लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

बाजारात सध्या डाळीचे भाव वधारले आहेत. तूर डाळ देखील चांगलीच महाग झाली आहे. एक किलो तूर डाळीसाठी लोकांना 160 ते 170 रुपये मोजावे लागत आहेत. अशा स्थितीत डाळींच्या वाढत्या किमतीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकार आता गव्हाप्रमाणे बफर स्टॉकमधून डाळी देखील विकणार असल्याचे बोलले जात आहे.

नाफेड आणि एनसीसीएफला आदेश

मीडिया रिपोर्टनुसार केंद्र सरकार लिलावाद्वारे बाजारात तूर डाळीची विक्री करणार आहे. यासाठी अन्न मंत्रालयाने नाफेड आणि एनसीसीएफला आदेश दिले आहेत. बाजारात तूर डाळीचा साठा वाढावा उद्देशाने नाफेड आणि NCCF ऑनलाइन लिलावाद्वारे मिल मालकांना डाळ विकतील. (Marathi Tajya Batmya)

याआधी पिठाच्या दरात 5 ते 7 रुपयांनी घट

दरम्यान केंद्र सरकारने जानेवारी महिन्यात पिठाच्या वाढत्या किमती रोखण्यासाठीही असाच निर्णय घेतला होता. त्यावेळी केंद्र सरकारनेच बफर स्टॉकमधून लाखो टन गहू लिलावाद्वारे बाजारात विकला. त्यामुळे महागाई नियंत्रणात आली. पिठाच्या दरात किलोमागे 5 ते 7 रुपयांनी घट झाली होती. सध्या बाजारात 30 ते 35 रुपये किलो दराने पीठ विकले जात आहे, मात्र जानेवारीत ते 35 ते 42 रुपये किलो दराने विकले जात होते. (Latest Political News)

डाळींचा साठा रोखण्यासाठी मर्यादा

केंद्र सरकारने 2 जून रोजी अत्यावश्यक वस्तू कायदा 1955 लागू करून डाळींचा साठा रोखण्यासाठी साठा मर्यादा निश्चित केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत डाळींच्या साठ्याची मर्यादा निश्चित करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार घाऊक व्यापारी 200 मेट्रिक टनपेक्षा जास्त डाळींचा साठा करू शकणार नाहीत, तर किरकोळ विक्रेते आणि डीलर्ससाठी ही मर्यादा ५ मेट्रिक टन एवढी आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT