US President Donald Trump during an interview where he suggested imposing a 250% import tariff on Indian pharmaceutical products. Saam TV News Marathi
देश विदेश

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला धमकी, औषधांवर २५० टक्के टॅरिफ, फार्मा क्षेत्राला धक्का

Trump Threatens India : डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय औषधांवर २५० टक्के आयात कर लावण्याची धमकी दिली आहे. यामुळे भारताच्या फार्मा उद्योगाला मोठा फटका बसेल आणि औषधांच्या किंमतीत वाढ होईल.

Namdeo Kumbhar

  • डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या औषधांवर २५०% टॅरिफ लावण्याचे संकेत दिले.

  • भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद न केल्यामुळे ट्रम्प नाराज.

  • भारत दरवर्षी अमेरिकेला सुमारे ७.५ अब्ज डॉलर्सची औषधे निर्यात करतो.

  • कर वाढल्यास भारताच्या औषध उद्योगावर तसेच अमेरिकन रुग्णांवर परिणाम होणार.

Donald Trump threatens 250% import tariff on Indian pharmaceutical products : वारंवार सांगून अन् धमक्या देऊनही भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद केलेले नाही. त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला पुन्हा एकदा धमकी दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय औषध उत्पादनांवर २५० टक्के आयातकर लावणार असल्याचे संकेत दिले आहेत. मंगळवारी एका एका मुलाखतीत ट्रम्प यांनी भारताच्या औषधांवर ३५० टक्के टॅरिफ आकारला जाऊ शकतो, असे सांगितले. ते म्हणाले की, सुरुवातीला औषधांवर कमी प्रमाणात कर लावला जाईल. पण पुढील एक ते दीड वर्षांत हा कर १५० टक्क्यांपर्यंत आणि नंतर २५० टक्क्यांपर्यंत वाढवला जाईल.

अमेरिकेतच औषध निर्मितीचा आग्रह

अमेरिका भारताकडून मोठ्या प्रमाणात औषधं आयात करतो. कोरोना महामारीच्या काळात भारताने अमेरिकेलाही मोठ्या प्रमाणात औषधांचा पुरवठा केला होता. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतच औषधांचे उत्पादन व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, औषध निर्मितीसाठी अमेरिका भारत आणि चीनसारख्या देशांवर खूप अवलंबून आहे. या नव्या करामुळे भारताच्या औषध उद्योगावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

भारताचा ६५ हजार कोटींचा औषध निर्यात

रिपोर्ट्सनुसार, भारत अमेरिकेला जेनेरिक औषधे, लस आणि औषधांचे सक्रिय घटक पुरवतो. २०२५ मध्ये भारताने अमेरिकेला सुमारे ७.५ अब्ज डॉलर (अंदाजे ६५ हजार कोटी रुपये) किमतीची औषधे निर्यात केली. अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनानुसार, अमेरिकेत वापरल्या जाणाऱ्या जेनेरिक औषधांपैकी जवळपास ४० टक्के औषधे भारतातून येतात. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णायामुळे भारताला ६५ हजार कोटींचा फटका बसू शकतो.

भारतीय औषध उद्योगाला फटका बसण्याची शक्यता

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय औषधांवर २५० टक्के कर लावला तर भारताच्या औषध उद्योगाला मोठा फटका बसू शकतो. कर वाढल्याने भारतीय औषध कंपन्यांना आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवाव्या लागतील. त्यामुळे नफ्यात मोठी घट होईल. या नुकसानापासून वाचण्यासाठी काही कंपन्या अमेरिकेतच उत्पादन सुविधा उभारण्याचा विचार करू शकतात.

अमेरिकेवरही वाईट परिणाम

डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयाचा परिणाम फक्त भारतावरच नाही, तर अमेरिकेवरही पडू शकतो. अमेरिकेत वापरली जाणारी बहुतांश जेनेरिक औषधे भारत आणि चीनमधून येतात. या औषधांच्या किमती वाढल्यास अमेरिकेतील रुग्णांना त्याचा त्रास सहन करावा लागेल. भारतातून निर्यात होणाऱ्या औषधांमध्ये प्रतिजैविके, नैराश्यावरील औषधे आणि हृदयरोगावरील औषधांचा समावेश आहे. भारत कमी किमतीत जेनेरिक औषधे तयार करतो. त्यामुळे अमेरिकेच्या आरोग्य सेवेला दरवर्षी अब्जावधी डॉलरची बचत होते. पण अमेरिकेने कर अतिप्रमाणात आकारला तर औषधांच्या किंमतीतही मोठी वाढ होऊ शकते. त्यामुळे याचा फटका अमेरिकेलाही होणार आहे.

भारत अमेरिकेला कोणत्या प्रकारची औषधे पुरवतो आणि त्याची किंमत किती आहे?

भारत अमेरिकेला जेनेरिक औषधे, लसी आणि औषधांचे सक्रिय घटक पुरवतो. २०२५ मध्ये भारताने सुमारे ७.५ अब्ज डॉलर (अंदाजे ६५ हजार कोटी रुपये) किमतीची औषधे अमेरिकेला निर्यात केली.

अमेरिकेच्या औषध बाजारात भारताचे योगदान किती आहे?

अमेरिकेतील ४०% जेनेरिक औषधे भारतातून आयात केली जातात.

भारताने २०२५ मध्ये अमेरिकेला किती किमतीची औषधे निर्यात केली?

७.५ अब्ज डॉलर (सुमारे ६५ हजार कोटी रुपये).

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Thursday : गुरुवारी त्रयोदशीला उजळणार, वाचा राशीभविष्य

Harshvardhan jadhav : रावसाहेब दानवे यांच्या जावयाला एका वर्षांचा तुरुंगवास, कारण काय? VIDEO

Hindustani Bhau: कोल्हापूरकरांना हिंदुस्तानी भाऊच्या शिव्या;भाऊला 'वनतारा'चा पुळका

High Court: फ्लॅट आकारनुसार द्यावा लागेल मेंटेनन्स; हायकोर्टाचा मोठा निर्णय

Dada Bhuse: शाळेत राष्ट्रगीतानंतर आता 'गर्जा महाराष्ट्र माझा' राज्यगीत गाणे बंधनकारक

SCROLL FOR NEXT