उत्तरकाशीच्या हर्षिल गावात ढगफुटीमुळे दरड कोसळली.
२० सेकंदाच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण गाव उद्ध्वस्त होताना दिसत आहे.
पावसामुळे पूर, भूस्खलन झालं; ६० पेक्षा अधिक लोक बेपत्ता.
आपत्ती व्यवस्थापनाचे पथक मदत आणि बचाव कार्य करत आहेत.
Uttarkashi Harshil Cloud Burst Video : उत्तराखंडमधील उत्तरकाशीमध्ये नुकतीच ढगफुटीची घटना घडली. २० सेकंदाचा व्हिडिओ समोर आलाय, त्यामध्ये अनेक घरावर दरड कोसळली अन् पाणी गावातून घरे उद्ध्वस्त करत जात असताना दिसत आहे. काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उत्तरकाशीमध्ये ढगफुटीमुळे अचानक मुसळधार पाऊस पडलाय, त्यामुळे पूर आणि भूस्खलन झाले. यामुळे अनेक गावांमध्ये पाणी शिरले, रस्ते आणि पूल उद्ध्वस्त झाले. अनेकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथके बचावकार्य करत आहेत. ६० पेक्षा जास्त लोक बेपत्ता असल्याची शक्यता आहे.
सोशल मीडियावर २० सेकंदाचा व्हिडिओ समोर आलाय. त्यामध्ये भूस्खलनमुळे दरड कोसळल्याचे दिसतेय. पाणी वाऱ्याच्या वेगाने गावात घुसले अन् होत्याचे नव्हते केल्याचे दिसतेय. पाण्यात घरे वाहून जात असतानाही दिसत आहे. २० सेकंदाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तोंडातून अरे रे असा शब्द निघाल्याशिवाय राहाणार आहे. पावसामुळे उत्तरकाशीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जनजिवन विस्कळीत झालेय. पाहा व्हिडिओ
उत्तराखंडमधील उत्तरकाशीमधील हृदयद्रावक व्हिडिओ व्हायरल होत आहे. येथील हर्षिल येथे ढगफुटी झाल्याने मोठा हाहाकार उडालाय. ढगफुटीमुळे खीर गाड नदीचे पाण्याची पातळी वाढली आणि धरालीखीर गाड परिसरात मोठ्या प्रमाणात माती-ढिगारा वेगाने वाहत आला. यामुळे गावातील अनेक घरांचे नुकसान झाले आहे. अवघ्या २० सेकंदात सर्व काही उद्ध्वस्त झाले. व्हिडिओमध्ये लोक ओरडताना दिसत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पूराचे पाणी अनेक हॉटेलांमध्ये शिरले आहे. पुराच्या पाण्यासह ढिगारा घरांमध्ये आणि दुकानांमध्ये घुसला आहे. ढिगाऱ्याखाली अनेक जण दबल्याची भीती आहे. तसेच, ६० जण बेपत्ता झाल्याची शक्यता आहे. धराली खीरगंगा येथे पाण्याची पातळी वाढल्याने धराली बाजार परिसरात मोठे नुकसान झाले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.