केंद्र सरकारच्या नव्या वाहन कायद्याला विरोध म्हणून देशभरातील वाहनचालकांनी तीन दिवसांसाठी संप पुकारलेला आहे. या संपामुळं पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्यानं राज्यातील अनेक भागातील पेट्रोल पंपावर मोठ्या रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राज्यात अनेक शहरात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे.
नांदेडमध्ये पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी दुपारी शहरातील दोन पेट्रोल पंप बंद पडले. रेल्वे स्टेशन आणि बाफना परिसरातील पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याने बंद पडले. दरम्यान शहरातील इतर पंपावर वाहन धारकांच्या अद्याप ही रांगा लागल्याचे चित्र आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
पेट्रोल पंपावरील पेट्रोल संपल्याने, बीड मधील अनेक पेट्रोल पंप बंद झाले आहेत. यामुळे आता वाहनधारकांसह दुचाकी धारकांना नाहक त्रास सहन करण्याची वेळ आली आहे. यामुळे वाहनधारकांमधून संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत. (Latest Marathi News)
परभणी जिल्ह्यात देखील पेट्रोल, पंपावर इंधन भरण्यासाठी गर्दीच गर्दी
स्टेरिंग छोडो आंदोलनाला परभणी जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणावर जाणवायला लागलाय. पेट्रोल पंपांवर वाहन चालकाची पेट्रोल भरण्यासाठी मोठ्या रांगा पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारच्या हीट अँड रन कायद्याविरोधात वाहतूकदारांनी व ट्रक चालकांनी पुकारलेल्या स्टेरिंग छोडो आंदोलनाला परभणी देखील मोठा प्रतिसाद मिळत आहे. पेट्रोल डिझेलचा तुटवडा होऊ शकतो, या भीतीने वाहन चालकांनी पेट्रोल पंपांवर गर्दी केली आहे.
दरम्यान, नवीन भारतीय न्यायिक संहितेच्या निषेधार्थ वाहन मालक आणि चालक देशभरात संपावर आहेत. नवीन कायद्यानुसार हिट अँड रन प्रकरणांमध्ये शिक्षेच्या तरतुदी अतिशय कडक करण्यात आल्या आहेत. यामध्ये चालकाला 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते. तेल टँकर चालकाने सांगितले की, चालकांना कायदा एकतर्फी आणि अत्यंत कठोर वाटतो. अपघाताच्या वेळी कोणी थांबल्यास जमाव त्याचे नुकसान करू शकते. दुसरीकडे वाहनचालक पळून गेल्यास त्याला कठोर शिक्षा होईल.
दरम्यन, पंजाब, हरियाणा आणि हिमाचलमध्येही पेट्रोल-डिझेलचे संकट निर्माण झाले आहे. तसेच पेट्रोलच्या कमतरतेमुळे देशभरात नवीन वर्षाच्या निमित्ताने आपले खासगी वाहन घेऊन फिरण्यासाठी गेलेले अनेक पर्यटकही देशातील विविध शहरात अडकले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.