Jitendra Awhad On Truck Drivers Protest
Jitendra Awhad On Truck Drivers Protestsaam tv

Truck Drivers Protest: ट्रकचालकांच्या बाबतीत आणलेला कायदा म्हणजे पोलिसी राज्य आणण्याचा व्यापक कट: जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad On Truck Drivers Protest: देशात पोलिसी राज्य आणण्याचा कट रचण्यात आला असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. आज एका आयोजित पत्रकार परिषदेत ते असं म्हणाले आहे.
Published on

>> हिरा ढाकणे

Jitendra Awhad On Truck Drivers Protest:

एखादी व्यक्ती दगावली तर ट्रकचालकाला लगेच दहा वर्षांसाठी तुरूंगात टाकायचे? हेच ट्रकचालक जीवाची पर्वा न करता सलग दहा दहा दिवस गाडी चालवून तुम्हाला जीवनावश्यक वस्तू पुरवतात. भारतात कोणाच्या कामाची किंमतच नाही राहिली का?, असं शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. देशात पोलिसी राज्य आणण्याचा कट रचण्यात आला असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. आज एका आयोजित पत्रकार परिषदेत ते असं म्हणाले आहे.

ते म्हणाले की, केंद्र सरकारने जे सीआरपीसीमध्ये बदल करताना एखादी व्यक्ती ट्रकखाली येऊन दगावली तर ट्रकचालकाला दहा वर्षे कैद आणि दहा ते 15 लाखांचा दंड, अशी तरतूद करण्यात आलेली आहे. मात्र अपघात घडतो त्यामध्ये फक्त ट्रकचालकाचीच चूक असते का? आव्हाड म्हणाले आहेत की, याबाबतचे नियम कठोर करावेत. याशिवाय झेब्रा क्रॉसिंगव्यतिरिक्त अन्य ठिकाणी रस्ता ओलांडणार्यांच्या घरच्यांनाही दहा लाखांचा दंड आकारा. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Jitendra Awhad On Truck Drivers Protest
Ajit Pawar News : लातूर-बार्शी-टेंभूर्णी राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला गती येणार, अजित पवारांचे अधिकाऱ्यांना निर्देश

जितेंद्र आव्हाड म्हणाले, ''हा कायदा फक्त ट्रकचालकांना नाही लावलाय तर छोट्या वाहनांनी जे अपघात होत असतात, त्यांनाही हा कायदा लागू करण्यात येणार आहे. म्हणजेच, चांगल्या -चांगल्या घरातील मुलंही जेलमध्ये जाणार आहेत. आतापर्यंत शिक्षेची मर्यादा दोन वर्ष होती. ती आता दहा वर्ष केली आहे. याचाच अर्थ हा गुन्हा आता न्यायदंडाधिकाऱ्यांकडून सत्र न्यायालयात वर्ग होणार असून आरोपींना जामीन मिळण्यासाठी किमान 90 दिवस लागणार आहेत.''  (Latest Marathi News)

आव्हाड पुढे म्हणाले, ''कोणताही कायदा करताना ज्यांचा सबंध सदर कायद्याशी येणार आहे. त्यांच्याशी चर्चा करणे गरजेचे असते. कायदा आपल्या मनाप्रमाणे करायचा नसतो. तर कायदा समाजासाठी उपयुक्त आहे की नाही, याचा सारासार विचार करून कायदा करायचा असतो. पण, या कायद्याने अनेकजण जेलमध्ये जातील. म्हणजेच आपल्या देशाचा जो परिघ आहे. त्याचा अर्धा भाग तुरूंगात रुपांतरीत करावा लागेल. आजमितीस तुमच्या जेलमध्ये जागा आहेत का?

Jitendra Awhad On Truck Drivers Protest
Raju Shetti: महाविकास आघाडीशी हातमिळवणी करणार का? राजू शेट्टींनी स्वत:च स्पष्ट केली भूमिका

ट्रकचालकांच्या बंदला काही राज्यात हिंसक वळण लागत आहे. याबद्दल पत्रकारांनी त्यांना प्रश्न केला असा ते म्हणाले की, हिंसेचे आपण समर्थन करीत नाही. पण जेव्हा ट्रकचालक उभे राहिले तर भारत बंद करू शकतात. आता या बंदमुळे भाज्या, अन्नधान्य, इंधन मिळणे बंद होणार आहे. जर पोलीस बंदोबस्तात वाहतूक करण्याचा प्रयत्न केला तरी, असे कितीसे पोलीस आहेत की ते ही वाहतूक सुरू करू शकतात. आधीच देशात 40% ट्रकचालक कमी आहेत . अशा स्थितीत अपघातामध्ये एखादी व्यक्ती दगावली तर त्याला लगेच दहा वर्षांसाठी तुरूंगात टाकायचे? हेच ट्रकचालक जीवाची पर्वा न करता सलग दहा दहा दिवस गाडी चालवून तुम्हाला जीवनावश्यक वस्तू पुरवतात. भारतात कोणाच्या कामाची किंमतच नाही राहिली का?, असं म्हणाले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com