Raju Shetti: महाविकास आघाडीशी हातमिळवणी करणार का? राजू शेट्टींनी स्वत:च स्पष्ट केली भूमिका

Raju Shetti News: शेतकरी संघटनेचे नेते, आज मंगळवारी माजी खासदार राजू शेट्टी यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.
Raju Shetti: महाविकास आघाडीशी हातमिळवणी करणार का? राजू शेट्टींनी स्वत:च स्पष्ट केली भूमिका
Published On

गिरीश कांबळे, मुंबई

Raju Shetti on Mahavikas Aghadi:

शेतकरी संघटनेचे नेते, आज मंगळवारी माजी खासदार राजू शेट्टी यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही बड्या नेत्यांच्या भेटीनंतर राजू शेट्टी हे महाविकास आघाडीशी हातमिळवणी करणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली. मात्र या भेटीनंतर माजी खासदार राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीसोबत जाण्याचा विचार नसल्याचे स्पष्ट केले. (Latest Marathi News)

राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राजू शेट्टी म्हणाले, महाविकास आघाडीसोबत जाण्याचा विचार नसून आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहोत. सध्या त्याचा पुनर्विचार करण्याचा प्रश्नच येत नाही. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राजकीय भेट नव्हती : राजू शेट्टी

'शेतकऱ्यांसाठी लढा सुरू आहे. उद्धव ठाकरेदेखील शेतकऱ्यांसाठी उद्योगपती विरोधात लढतात. अदानी विरोधातील लढाई ही शेतकऱ्यांसाठी आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंची भेट घेतली. उद्धव ठाकरे आणि माझी भेट राजकीय नव्हती. मात्र, नेहमी तुमच्यासोबत राहू , असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले. शेतकऱ्यांसाठीच्या लढ्यात उद्धव ठाकरेंचा पाठिंबा असल्याचेही शेट्टी यांनी सांगितले.

महाविकास आघाडीच्या जागावाटपावर राजू शेट्टी काय म्हणाले?

महाविकास आघाडीच्या जागावाटपावर राजू शेट्टी यांनी भाष्य केलं. 'माझं महाविकास आघाडीसोबत काही देणं घेणं नाही, मी वेळोवेळी स्पष्ट केलं असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितलं.

'महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस-राष्ट्रवादीने कारखानदारांना पूरक अशाप्रकारे एफआरपीचे तुकडे करणे किंवा भूमी अधिग्रहण कायद्याची मोडतोड केली. रस्त्यालगत जमिनीचा शेतकऱ्यांना चार ते पाच पट मोबादला मिळायचा. ते कमी करण्याचं काम महाविकास आघाडी सरकारने केलं, असा आरोप राजू शेट्टी यांनी यावेळी केला.

Raju Shetti: महाविकास आघाडीशी हातमिळवणी करणार का? राजू शेट्टींनी स्वत:च स्पष्ट केली भूमिका
Loksabha Election 2024: शरद पवार फुंकणार लोकसभेचे रणशिंग; शिर्डीत राष्ट्रवादीचे २ दिवसीय शिबीर

'आमचे काही आक्षेपाचे मुद्दे आहेत. त्या मुद्द्यांवर जोपर्यंत स्पष्टीकरण मिळणार नाही. तोपर्यंत महाविकास आघाडीवर जाण्याचा प्रश्न येत नाही. तरीसुद्धा त्या धोरणाला आमचा विरोध आहे. आघाडी उद्योग समूहाच्या विरोधात लढते, त्यावेळी चळवळीत मदत घेणं गैर नाही, असंही स्पष्टीकरण शेट्टी यांनी दिलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com