Unique Prapose News Saamtv
देश विदेश

Unique Style Propose: सिंगल्यांनो घ्या भावाचा आदर्श! गर्लफ्रेंडला केला असा भन्नाट स्टाईल प्रपोज; होकारही दिला अन् गडी रातोरात स्टारही झाला...

Propose by using Keyboard Viral News: हटके प्रपोज स्टाईल....| जास्त काही नाही, फक्त एका किबोर्डच्या साहाय्याने तरुणाने गर्लफ्रेंडला प्रपोज केलं अन् तीनं क्षणात होकारही दिला....

Gangappa Pujari

BoyFriend Unique Style Propose Trending News: प्रेम हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अविभाज्य, आणि सुंदर प्रवास असतो. आपल्या प्रिय व्यक्तीला आपल्या मनातले भाव सांगणे ही वाटती तितकी सोपी गोष्ट नाही. प्रेम व्यक्त करण्यासाठी जितके धाडस लागते, तितकेच ते व्यक्त करण्यासाठी कलाही असावी लागते. कारण प्रपोज हा असा क्षण असतो, जो तुमच्या प्रिय व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल भाव निर्माण करतो.

सध्या अशाच एका हटके प्रपोजची सोशल मीडियावर तुफान चर्चा होताना दिसत आहे. इतकेच नव्हेतर या प्रपोजने हा तरुण या प्रपोज स्टाईलमुळे रातोरात स्टारही झाला आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण, (Viral News) चला जाणून घेवू....

काय आहे नेमकं प्रकरण...

प्रेम करणं जितकं सोप्प त्यापेक्षा अवघड प्रसंग म्हणजे प्रपोज.. समोरच्या तरुणीला आवडेलं अशी शब्दरचना करणं, प्रपोजची हटके स्टाईल शोधणं हे तरुणांसमोरील मोठे आव्हान. अनेकदा प्रपोज करण्याची हिंमत न झाल्याने अनेक प्रेमवीरांच्या प्रेमकथा समोरच आल्या नाहीत, किंवा ऐन प्रपोज करताना उडालेल्या भंबेरीनेही अनेकदा लवस्टोरीचा द इंड झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. मात्र सध्या एका हटके स्टाईल प्रपोजने प्रेमवीरांचा कॉन्फिडन्स चांगलाच वाढला आहे.

या तरुणाच्या हटके स्टाईल प्रपोजची कथा त्याच्या गर्लफ्रेंडनेच सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामुळे दोघेही रातोरात स्टार झाले आहेत. विशेष म्हणजे जास्त काही नाही फक्त एका किबोर्डमधून या भावाने प्रपोज केला आहे....

गर्लफ्रेंडने ट्विट केला फोटो....

@amymaymacc नावाच्या तरुणीने आपल्यया ट्विटर अकाऊंटवर तिच्या बॉयफ्रेंडसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. या ट्विटमध्ये तिने तिच्या प्रियकराने कीबोर्डच्या माध्यमातून कसे प्रपोज केले हे सांगितलं आहे. “त्याने कीबोर्डद्वारे मला गर्लफ्रेंड बनण्यासाठी प्रपोज केलं, मी हे कधीच लपवून ठेवणार नाही” असा सुंदर कॅप्शनही या ट्विटला दिला आहे.

हटके प्रपोजची स्टाईल..

या तरुणाने किबोर्डच्या बटणांद्वारे आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. त्याने किबोर्डच्या बटणांचा वापर करत ‘Be My Girlfriend Sayang’ अशी अक्षरे तयार केली आहेत. ज्याचा फोटो या तरुणीने शेअर केला आहे. तसेच दुसऱ्या फोटोमध्ये हे जोडपं हसताना दिसत आहे.

या प्रपोजने तरुणाला त्यांच प्रेम तरं मिळालेच. पण हे दोघेही रातोरात स्टार झाले आहेत. हजाराहून कमी फॉलोअर्स असलेल्या या ट्विटर अकाऊंटवरील पोस्टला आतापर्यंत २३ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर या पोस्टला अडीच लाखांहून अधिक लोकांनी लाईक केलं असून त्यावर हजारो नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

अनेकांनी त्याच्या या पोस्टवर ही स्टाईल खरचं भन्नाट असल्याचे म्हणले आहे. तर काही जणांनी आता आम्हीही असाच प्रपोज करतो, अशाही प्रतिक्रिया दिल्या आहेत.. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur : जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्यानं कारागृहातच स्वत:ला संपवलं, अंतर्वस्त्रानंच....

Akola Crime : धक्कादायक! अकोल्यात एमडी ड्रग्स तस्करी; आरोपीचं वंचित बहुजन आघाडीचं कनेक्शन उघड

PAN Card: तुम्हीही अजून पॅन कार्ड-आधार कार्डसोबत लिंक केलं नाही? नवा नियम लागू, बसेल मोठा फटका

Maharashtra Live News Update: मावळमध्ये एसटी बस आणि खासगी बसचा अपघात, 11 प्रवासी जखमी

Mumbai Metro: ठाणे ते गेट वे ऑफ इंडिया; आणखी एका मेट्रोचा प्रस्ताव, 13 ठिकाणी असणार स्टॉप

SCROLL FOR NEXT