Heart Health : हृदयविकाराच्या रुग्णांसाठी काजू-बादाम वरदान की शाप? तज्ज्ञांचा हा खुलासा वाचायलाच हवा

heart care food : हृदयाशी संबंधित आजार असलेल्या रुग्णांना आहाराबाबत विशेष काळजी घेण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो. मात्र, सुका मेवा विशेषतः काजू आणि बदाम हृदयरुग्णांसाठी सुरक्षित आहेत का, असा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. डॉक्टरांनी याबद्दल सर्व माहिती दिली आहे.
ARE CASHEWS AND ALMONDS SAFE FOR HEART PATIENTS?
ARE CASHEWS AND ALMONDS SAFE FOR HEART PATIENTS? saam tv
Published On: 

हृदयविकाराचे नाव निघताच आहारातून तेल, तूप आणि सुकामेवा पूर्णपणे बंद करण्याचा सल्ला अनेकदा दिला जातो. यातही विशेषतः काजू आणि बदामाबाबत लोकांच्या मनात नेहमीच मोठा गोंधळ असतो. एका बाजूला बदामाला हृदयाचे रक्षण करणारे 'सुपरफूड' मानले जाते, तर दुसऱ्या बाजूला काजूमधील फॅट्समुळे रक्तवाहिन्या ब्लॉक होतील अशी भीती पसरवली जाते. त्यामुळे हृदयविकाराच्या रुग्णांसाठी हे ड्रायफ्रूट्स खरोखरच संजीवनी ठरतात की आजार वाढवणारा शाप ठरू शकतात, याविषयीचे संपूर्ण माहिती समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

हृदयाच्या आरोग्यासाठी काजू-बदाम फायदेशीर

तज्ञांच्या मते, हृदयरोगी मर्यादित प्रमाणात काजू आणि बदामाचे सेवन करू शकतात. हे दोन्ही ड्रायफ्रूट्स हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करतात. यामध्ये असलेले निरोगी फॅट्स , फायबर, प्रोटीन, जीवनसत्त्वे आणि खनिज द्रव्ये शरीरासाठी अत्यंत गुणकारी ठरतात.

ARE CASHEWS AND ALMONDS SAFE FOR HEART PATIENTS?
Winter Skincare : हिवाळ्यात मॉइश्चरायझर लावूनही त्वचा कोरडी पडतेय? तर हे सोपे घरगुती उपाय करून पहा

बदामाचे फायदे

बदामामध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स, फायबर आणि व्हिटॅमिन-ई भरपूर प्रमाणात असते. हे घटक शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करण्यास आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून बचाव करण्यास मदत करतात.

काजूचे फायदे

काजूमध्ये मॅग्नेशियम, कॉपर आणि हेल्दी फॅट्स असतात. हे घटक हृदयाची कार्यप्रणाली सुरळीत ठेवण्यासाठी आणि मेटाबॉलिक आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

ARE CASHEWS AND ALMONDS SAFE FOR HEART PATIENTS?
Kitchen Hacks : हिवाळ्यात हिरव्या पालेभाज्या स्वच्छ करण्याच्या या 3 टीप्स जाणून घ्या

दिवसातून किती आणि कसे सेवन करावे?

हृदयरुग्ण दररोज सुमारे २० ते ३० ग्रॅम म्हणजेच एका लहान मुठीएवढा सुका मेवा खाऊ शकतात. यामध्ये साधारणपणे ५ ते ६ बदाम आणि ३ ते ४ काजू समाविष्ट करता येतात. मात्र, ही मात्रा प्रत्येक व्यक्तीच्या शारीरिक गरजेनुसार आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बदलू शकते.

या गोष्टींची काळजी घ्या

  • नेहमी कच्चे किंवा हलके भाजलेले आणि मीठ नसलेले नट्स खावेत.

  • तळलेले, जास्त मीठ घातलेले किंवा साखरेचे कोटिंग असलेले ड्रायफ्रूट्स खाणे टाळावे.

  • रुग्णाला किडनीचा आजार, पोटॅशियमची समस्या किंवा नट्सची ॲलर्जी असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय याचे सेवन करू नये.

टीप : ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. आरोग्यासंबंधित कोणत्याही समस्या असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.